पेनांगला आम्ही पोचलो तेंव्हा सकाळचे दहा साडेदहाच वाजले होते. घरून सकाळी पाच वाजता निघाल्याने प्रवासाचा शीण वगैरे येण्याचे खरे म्हणजे काही कारण नव्हते. पण मला केंव्हा एकदा हॉटेलवर पोचतो असे झाले होते. आम्हाला न्यायला जी गाडी आली होती त्याचा चालक मात्र आम्ही जाता जाता रस्त्यावरच असलेल्या काही जागा बघितल्याच पाहिजेत असा आग्रह सारखा करत होता. शेवटी त्याच्या आग्रहाला बळी पडून ...