देवनागरी
Roman
Press F12 to toggle

समाज

इंडिया आफ्टर गांधी : एका अनपेक्षित देश... सोमवार, ३० जानेवारी २०१२, १४:०३ (+०५:३०)

Random Thoughts

शाळेत असताना डोक्यावर विज्ञानाचे भूत होते. याचा एक परिणाम म्हणजे कला शाखा आणि प्रामुख्याने इतिहास, नागरिकशास्त्र यांच्याकडे दुर्लक्ष झाले. सनावळी आणि तहांच्या तारखा घोकून पाठ करण्यापलिकडे इतिहासाचे महत्व काय हे ठाऊक नव्हते. ते महत्व लक्षात आणून द्यायला देतील असे शिक्षकही नव्हते, किंबहुना त्या शिक्षकांनाही ते महत्व कळले होते की नाही ...

ऍन ऍन्थ्रॉपॉलॉजिस्ट ऑन मार्स शुक्रवार, १३ जानेवारी २०१२, १२:३० (+०५:३०)

Random Thoughts

ताजमहालाच्या समोर राहणार्‍यांना रोज उठून ताजमहाल बघितल्यानंतर काय वाटत असेल? की समोर काय आहे त्यांच्या लक्षातही येत नसेल? अतिपरिचय असल्यावर अशी अवज्ञा अनेक गोष्टींबाबत होते, किंबहुना गोष्ट जितकी वरकरणी सामान्य तितकी असं व्हायची शक्यता जास्त. आपण ज्या गोष्टींना गृहित धरून चालतो, त्या तशा नाहीत हे बरेचदा कळणे अवघड असते. यामागे 'कॉमन सेन्स' वापरून ठरवलेली गृहीतके ...

ब्लॉगविश्व - त्यांचं आणि आपलं मंगळवार, २० डिसेंबर २०११, २०:१८ (+०५:३०)

Random Thoughts

दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी टाइम मासिकाने २५ सर्वोत्कृष्ट ब्लॉगांची यादी जाहीर केली. भूकंपापासून ते इजिप्तच्या उठापापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण घटनांची चित्रांमधून माहिती देणारा बोस्टन ग्लोबचा 'द बिग पिक्चर' असो की म्हैलामंडळाच्या सगळ्या शंकांचे निवारण करणारा 'द हेअरपिन' असो, या ब्लॉगांच्या विषयांमध्ये माफक वैविध्य आहे. केन लेव्हिन M*A*S*H, एव्हरीबडी लव्हज रेमंड किंवा ...

हा माझा मार्ग एकला! रविवार, ०४ डिसेंबर २०११, ०७:२१ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

आपले वय जसजसे वाढत जाते ना, तसतसे काहीतरी नवीन नवीनच प्रश्न आपल्या समोर येऊन उभे रहायला लागतात. या प्रश्नांची, अडचणींची आपल्याला माहितीच नसते असे काही नसते. आपल्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या कोणी ना कोणी व्यक्तीने मागे, आपण तरूण असताना, या प्रश्नांचा सामना केलेलाच असतो. परंतु परदु:ख शीतल असते असे म्हणतात. त्यामुळे कदाचित असा काही प्रश्न आपल्या स्वत:च्याच आयुष्यात येऊन पुढे ...

अब्रू ची किंमत किती आहे हो?? गुरुवार, ०१ डिसेंबर २०११, २१:५५ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

तुमच्या  अब्रूची किंमत किती ? विचित्र वाटतोय का प्रश्न? कदाचित असेलही, कारण लिहितांना पण मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. इथे ...

म्हणींच्या राज्यातील गमतीजमती रविवार, २७ नोव्हेंबर २०११, २०:०३ (+०५:३०)

iravati अरुंधती kulkarni Iravati अरुंधती

पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत  असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.

बोले तो तू करता क्या है मामू? शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, १४:२८ (+०५:३०)

Raj Random Thoughts

हल्ली मला हा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो. "तू काय करतोयस?" लोक ओळखीचे असतील तर 'य' असतो, पहिल्यांदा भेटत असतील तर नसतो. :)
खर तर हा प्रश्न साधा आहे आणि ९९.९९% लोक याचे उत्तर "मी इथे आहे, मी तिथे अमुक करतो" असे देतात. सध्या माझ्यासाठी मात्र या प्रश्नाचे उत्तर बदलणारे आहे कारण मी याचे खरे उत्तर द्यायचे ठरवले तर "मी फ्रेंच शिकतोय" किंवा "मी लेख लिहीतो" असे द्यावे लागेल. तसे ...

गोरिला माकडे, रुढी आणि परंपरा सोमवार, १४ नोव्हेंबर २०११, ०७:४२ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

माझ्या एका मित्राने दोन दिवसांपूर्वी, ई-मेलने मला एक मोठी रोचक गोष्ट पाठवली आहे. ही गोष्ट आहे एका पिंजर्‍यात रहाणार्‍या आठ गोरिला माकडांची. या पिंजर्‍यात मध्यभागी एक शिडी ठेवलेली आहे. या शिडीवर चढले की थेट पिंजर्‍याच्या छतापर्यंत हात पोचू शकतो. या छतावर एक केळे टांगलेले आहे. कोणत्याही गोरिला माकडाने शिडीवर चढण्याचे कष्ट घेतले की त्याला एक केळे मिळू शकते. या सर्व गोरिलांना ...

बंड्याची दिवाळी शनिवार, २९ ऑक्टोबर २०११, १७:१३ (+०५:३०)

iravati अरुंधती kulkarni Iravati अरुंधती

आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने ...

माध्यमं.. मुलं.. समाज.. गुरुवार, २७ ऑक्टोबर २०११, १२:०२ (+०५:३०)

विनायक पंडित ABHILEKH

कार्टून फिल्म्स ज्यांच्या अत्यंत आवडत्या होत्या ती बालकं कालांतराने टीव्हीवरच्या कौटुंबिक मालिकांमधे रमली.आता ती बालकं सोशल नेटवर्कींग साईट्सच्या आहारी गेली आहेत.वेगवेगळी सर्वेक्षणं आणि त्यांचे प्रसिद्ध होत रहाणारे निष्कर्षं मनोरंजक असतात.त्यांमधे तथ्यंही असतंच.
लहान मुलं दूरचित्रवाणी मालिकांमधे काय बघत असतात, किंवा होती? चकचकीत घरं? सतत लग्नंसमारंभातले ...