देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पुणे

पुणेरी वेटर मंगळवार, २० जुलै २०१०, २०:५५ (+०५:३०)

अभिजीत Nirankush

तिरसटपणाबद्दल पुणेकर प्रसिद्ध आहेतच. नुकताच विद्याधरने पुण्याबद्दल लेख लिहिला आहे. तो वाचून मला पुण्यातील काही तिरसट उत्तरांची आठवण झाली. जरी येथील दुकानदारांच्या तिरसटपणाचे बरेच किस्से आहेत तरी इथल्या हॉटेलातील वेटरसुद्धा काही कमी नाही. मला किंवा माझ्या मित्रांना आलेले पुणेरी वेटरांचे काही अनुभव सांगत आहे.

१) स्थळ : Up & Above - मागवलेली रोटी एकदम गार आली. ...

पुणे आणि पाणी कपात मंगळवार, २० जुलै २०१०, १७:५४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

अलीकडे जवळ जवळ प्रत्येक वर्षी, जून किंवा जुलै महिन्यांत, पुण्याच्या पाणी पुरवठ्यामधे कपात होणार अशी बातमी कधीतरी हमखास प्रसृत केली जाते. पुण्यातले लोक कसे जास्त पाणी वापरतात, पाण्याची कशी नासाडी करतात वगैरे विषय मग मोठ्या चवीने चर्चिले जातात. मग एकदम अचानक पाऊस बरसू लागतो. तो इतका बरसतो की अगदी नकोसा होऊ लागतो. हा असा पाऊस, आठ दहा दिवस जरी बरसला तरी पुण्याला पाणी पुरवठा करणारी ...

पुणं आणि मी रविवार, १८ जुलै २०१०, १७:४५ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

पुणं. नाव घेतलं की एकदम भरीव काहीतरी म्हटल्यासारखं वाटतं. दोन अक्षरांचा शब्द, पण त्यात जो भरीवपणा मला जाणवतो तो, तिथल्या माझ्या जन्मामुळे की माझ्या आजोळामुळे की त्या स्थानाच्या एकूणच महात्म्यामुळे हे मला कळत नाही.

पुणं प्रसिद्ध झालं, ते पेशव्यांमुळे. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशव्यांनी पुण्याला राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. पुण्याची सांस्कृतिक जडणघडण व्हायला ...

….लंगडी घालाया लागली. मंगळवार, २२ जून २०१०, १८:३८ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

पोस्टच नाव वाचुन ही पोस्ट ’कोंबडी पळाली’ हया गाण्यासंदर्भात आहे असा गैरसमज अजिबात करुन घेउ नका.तर ही पोस्ट परवा पुण्यात झालेल्या ब्लॉगर्सच्या सहल कम मीट ...

मुंबईकरांचा पुणेरी दौरा… मंगळवार, २२ जून २०१०, ०७:२६ (+०५:३०)

सुहास Suhas Zele's Blog

आधीच सांगतोय मला मुंबईकर आणि पुणेकर असा काही वाद घालायचा नाही, त्यामुळे उग्गाच असा गैरसमज करून घेऊ नये पोस्टच्या शीर्षकावरून. ते शीर्षक फक्त एकाच करणामुळे, मुंबईकरांची मेजॉरिटी होती ह्या छोटेखानी भेटीला.

पेठे काका यानी मागील वर्षी आयोजित पुणे बलॉगर्स मेळाव्याला इच्छा असून पण मला हजर नाही राहता आला याची खंत खूप दिवसापासून होतीच. त्याना मुंबई बलॉगर मेळाव्यालापण ...

ब्लॉगवाले आणि शेंह्गड! मंगळवार, २२ जून २०१०, ००:३७ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

टीप : नोंद लिहिताना मी उपस्थितांच्या नावांचे स्वैर उल्लेख केलेत, त्यामुळे सुरूवातीलाच उपस्थितांची यादी लिहितो, जेणेकरून वाचताना प्रश्न पडणार नाहीत.

१. सुरेश पेठे उर्फ पेठेकाका. २. अनुजा पडसलगीकर उर्फ अनुजाताई. ३.(तन्वीताई+अमित+ ईशान+गौरी) देवडे. ४. सुहास झेले. ५.सचिन उथळे-पाटील ६. देवेंद्र चुरी. ७.भारत मुंबईकर. ८.आनंद(पत्रे+काळे). ९.अभिजीत वैद्य. १०.अस्मादिक.(कोणी राहिलं नाहीये ना? ...

कैवल्यकुटी शनिवार, १९ जून २०१०, १०:३६ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रि...

माझी ७ घर आहेत, म्हणजे मी आत्ता पर्यंत ७ घरांमध्ये राहिलो आहे आता तो ownership चा criteria वगैरे लावु नका म्हणजे झाले. माझे वडिल बँकेत आहेत (आपल्या जिव्हाळ्याच्या बॅंकेत) त्यामुळे दर ३ वर्षांनी बदली न चुकता व्हायची, त्यामुळे भुसावळ, डोंबीवली, चाळिसगाव आणि पुणे या ठिकाणी माझे फ़िरणे झाले, आणि माझ्या नोकरी निमित्त आता मी ठाण्यात आहे.

तर सुरुवात झाली माझ्या जन्मापासुन म्हणजे बघा १९८६ सालचा ...

तारीफ पे तारीफ रविवार, २३ मे २०१०, ०९:१३ (+०५:३०)

अभिजीत Nirankush

कॉलेजनंतर लगेच नोकरी पकडल्याचा एक फायदा म्हणजे बहुतेक प्रत्येक विकांतामध्ये आमचा सगळा ग्रुप एकत्र भेटण्याच्या निमित्ताने एकाद्या हॉटेलात जाऊन मनसोक्त हादडतो. त्यामुळे महाराष्ट्रीयन, कोल्हापुरी, थाई, Mexican, चायनीज, इटालियन खाद्यपदार्थ मिळणाऱ्या सगळ्या बहुतेक सगळ्या हॉटेलांची वारी झाली आहे. अश्याच प्रकारे नवीन हॉटेलांचा शोध घेताना मागच्या वर्षी "तारीफ" या हॉटेल बद्दल कळले ...

चविने खाणार पुण्याला.. रविवार, १६ मे २०१०, २१:४५ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते.....

तुम्ही एखाद्या हॉटेलमधे  जाता. जर फाइव्ह स्टार हॉटेल असेल तर,  त्या हॉटेलमधे लॉबी मधे शिरल्या बरोबरच आपल्या  पेक्षा ...

चविने खाणार पुण्याला.. रविवार, १६ मे २०१०, २१:४५ (+०५:३०)

महेंद्र काय वाट्टेल ते...

तुम्ही एखाद्या हॉटेलमधे  जाता. जर फाइव्ह स्टार हॉटेल असेल तर,  त्या हॉटेलमधे लॉबी मधे शिरल्या बरोबरच आपल्या  पेक्षा ...