परिपूर्णता ही एका स्वप्नासारखी असते, हातास कधीच लागत नाही पण तिचं एक चित्र डोक्यात पक्कं बसलेलं असतं. पुरणा-वरणाचा स्वयंपाक म्हटला की माझ्या डोळ्यांसमोर असंच चित्र उभं रहातं. केळीच्या पानावर, नाजूकपणे, जागच्या-जागी मांडलेल्या चटण्या-लोणची, कोशिंबिरी, भाज्या, भाताच्या मुदी, भजी, पापड, थेंबभर खीर, कटाची आमटी, कढी, पंचामृत आणि या साऱ्या बेताचा केंद्रबिंदू असलेली पुरणाची पोळी! ...