देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कविता

अज्ञानी मंगळवार, २२ मे २०१२, १५:०९ (+०५:३०)

थोडेसे मनातले ...

मला अज्ञानीच राहू दे
अर्थ नको सांगूस लावायला
अर्थ न लावता
शिकायचय मला जगायला
बेधुंद होऊन चालायला
ठेचकाळले तरी पुन्हा उठायला
आणि ...

अंतर्मनाची हांक सोमवार, २१ मे २०१२, ११:१६ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

अंतर्मनाची हांक

नसे कुणी मी श्रेष्ठ कवी, वा ज्ञानी या जगतीं

अभिमान वाटतो त्याचा मजला, जे माझ्या ललाटीं

कृपादृष्टी ही दिसून आली, काव्येश्र्वरीची थोडी

रचून कांही कविता सेविली, धुंदीमधली गोडी

आशिर्वाद जरी असला तिचा, माझी ती बालके

पितृत्वाचे नाते समजूनी, त्याना मी देखे

कौतुक करतील कांही मंडळी, ...

कुठवर राखावे भोळेपण? शुक्रवार, १८ मे २०१२, १९:१९ (+०५:३०)

मनोज बोबडे शब्द सांगाती सर्वदा!!

देव-देवतांच्या आधारे—फलज्योतीष्याचे बळ सारे|दुकान थाटून बसले कोणी—स्वतःस श्रेष्ठत्तम जाणोनी|गुलाम होईल ऐशा ज्ञाना—जनतेमध्ये पसराविताना|लाज मुळी मानसी न काही—फक्त हित अपुलेच पाही| कशी रीत ती चला पाहण्या—ऐकून घेऊ सतर्क होण्या|
किती आजवर केले भाकीत—वेळ ती येता बसले झाकीत|

कुठवर राखावे भोळेपण? शुक्रवार, १८ मे २०१२, १८:५८ (+०५:३०)

मनोज बोबडे शब्द सांगाती सर्वदा!!

देव-देवतांच्या आधारे—फलज्योतीष्याचे बळ सारे|दुकान थाटून बसले कोणी—स्वतःस श्रेष्ठत्तम जाणोनी|गुलाम होईल ऐशा ज्ञाना—जनतेमध्ये पसराविताना|लाज मुळी मानसी न काही—फक्त हित अपुलेच पाही| कशी रीत ती चला पाहण्या—ऐकून घेऊ सतर्क होण्या|
किती आजवर केले भाकीत—वेळ ती येता बसले झाकीत|

सुप्तनाते सोमवार, १४ मे २०१२, २३:०४ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

सुप्तनाते

तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना

तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
मला कुस्करावेस मर्जीप्रमाणे, शिरोधार्य आहे तुझी भावना

तुला जाण नाही, मला भान नाही, कसा चालणे सांग संसारगाढा
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, न पेक्षा बर्‍या मग खुल्या ...

सांगता रविवार, १३ मे २०१२, १०:०८ (+०५:३०)

क्रांति अग्निसखा

व्याकूळ होणे स्वभावात नाही, अशांना व्यथा आठवाव्यात का?
आनंदरागावलीच्या स्वरांनी विराण्या उगा आळवाव्यात का?
झाकोळलेल्या जरी पायवाटा, कुणी चालणे सांग सोडेल का?
नाते फुलांचे गळा फास झाले तरी दैव ते बंध मोडेल का?

तू लाखदा माग, साऱ्या अपेक्षा कधी पूर्ण होतात का या जगी?
जाणूनही वेड का पांघरावे, निराशेत गुंतून जावे उगी?
धारेत झोकून ...

सालगिरह शनिवार, १२ मे २०१२, ००:०० (+०५:३०)

sanket मन वढाय वढाय....

हर बरस सालगिरह पर यूँ ही हँसते हँसतेहर कोई उम्र में इक साल बढ़ा लेता हैवक़्त एक सेंध लगाता हुआ आहिस्ता सेउम्र के पेड़ से एक शाख चुरा लेता हैवक़्त के अपार इतिहास में झाँको तो ज़राकहाँ वर्तमान, कहाँ ...

क्रौंच पक्षाला मुजरा गुरुवार, १० मे २०१२, ०९:५१ (+०५:३०)

जीवनाच्या रगाड्यातून

पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते.

” मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः

यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् “

(जगातले तेच प्रथम पद्यकाव्य समजले गेले.)

अक्षता मंगळवार, ०८ मे २०१२, २०:०४ (+०५:३०)

Abhishek Ashtekar अनुबंधित

तू तशी सजशील जेव्हा, मी तुला पाहीन दुरुनीसाजरी प्रतिमा तुझी, घेईन मी डोळ्यांत भरुनी.
आपुले क्षण सोबतीचे, सांग का ते भास होते ?कोवळे अनुबंध होते, की कशाचे फांस होते ?गंध ते हळवेपणाचे, बोलल्या शब्दास होते.गुतंलो जणु एवढे की, वेगळे ना श्वास होते.का सये उजवून सारे, तू अशी गेलीस फिरुनी ?
शोधतो हरवून काळोखात आता बंद ...

हिच खरी समस्या असे जीवनाची मंगळवार, ०८ मे २०१२, १०:५२ (+०५:३०)

कृष्ण उवाच

 

 

सांजवेळी आली आठव सजणाची
हिच खरी समस्या असे जीवनाची

ओठावरती ढंग आणिला हास्याचा
विस्मरूनी सजणा हर्ष आणिते क्षणाचा
अचानक हे काय झाले
चेहर्‍यावरी रंग चढला विषादाचा

केला अहंभाव दूर असताना