देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गीत

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले सोमवार, ०९ जानेवारी २०१२, ०४:३४ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले

तो:
ओठ गुलाबी काय नकळत बोलले
ती:
अं हं
तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले

तो:
संध्या आज का फुलूनी आली
रंग तांबडे सोनेरी ल्याली

ती:
दिवसा रातीच्या मिलनवेळी
संध्या असली फुलूनी आली
लाजलाजूनी बघ झाली वेडी
त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले

तो:
पाण्यावरचे तरंग का हालती डुलती

का हा दुरावा...("तेरे मेरे बीच में... गुरुवार, ०५ जानेवारी २०१२, ००:२७ (+०५:३०)

बाळासाहेब तानवडे काव्यरंग(Marathi Kavita)

तुझ्या माझ्या प्रेमात ग २ का हा दुरावा कळेना. २ मला ही कळेना,तुला ही कळेना २ . तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा कळेना.
तन दोन आपुले ग मन एक आहे २ . तुझ्या माझ्या डोळ्यातील स्वप्न एक आहे. चूक मी पाहे हो ...शोधून ती पाहे, ती मिळेना२ . मला ही कळेना, तुला ही कळेना. तुझ्या माझ्या प्रेमात ग का हा दुरावा ...

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची शनिवार, ३१ डिसेंबर २०११, ०३:०३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन
माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||

या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला
पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला
बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर
अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन

युगलगीत: बासूंदी गोड गोड शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, ०४:५८ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

युगलगीत: बासूंदी गोड गोड

तो:
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड
तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ||

ती:
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल
तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ||

तो:
दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग
बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग
गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं
तू माझी बासूंदी बासूंदी ...

(प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, ०२:१९ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

तुझी माझी प्रित जमली

(टु ऋ : चाल एखाद्या भांगड्यासारखी आहे ब्वॉ.)

तो:
दे हातात तुझा मला हात सजणे
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
दे हातात तुझा मला हात साजणा
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

ती:
लपून छपून प्रेम ते केले
कधी कुणा नाही कळले
आता वाट नको पाहू
वेळ लग्नाची झाली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //

तो:
कानी तुझ्या ...

दत्त दत्त बोलत गेलो बुधवार, २८ डिसेंबर २०११, ०४:४३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

दत्त दत्त बोलत गेलो

दत्त दत्त बोलत गेलो
गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो
दत्ताला भजूनी धन्य झालो
झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो ||

दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी
जगामधे मीच आहे सर्व सुखी
नकळे मला मी कोण होतो
दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो ||

कळीकाळानं असला कसला मौका साधला बुधवार, २८ डिसेंबर २०११, ०४:४२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

कळीकाळानं असला कसला मौका साधला

कळीकाळानं असला कसला मौका साधला
व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला ||धृ||

बाप तू रं आमचा तूच आमची माय
दूध बी तूच आन तूच दूधावरली साय
कोना म्हनू आता आमी माय अन बाप
...

चालू नको अशी तू बुधवार, २८ डिसेंबर २०११, ०४:४१ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

चालू नको अशी तू

चालू नको अशी तू तोर्‍यात ग तोर्‍यात
केस उडतात भुरूभुरू वार्‍यात

केस तुझे मखमली आले गाली
ओठांवर तिळ शोभे गाली खळी
नको तिरक्या नजरेनं पाहू
मीच दिसे तुझ्या डोळ्यात

खट्याळ वारा तुझा ...

Why This kolavery ... Di Marathi Versi... शनिवार, १७ डिसेंबर २०११, २३:१६ (+०५:३०)

बाळासाहेब तानवडे काव्यरंग(Marathi Kavita)


मित्रांनो, मी हाय कोल्हापुरी , लई भारी.चला वाजवा.आम्ही कोल्हापूरी .. जगात भारी.
मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा.
रांगड वागणं , बोलणं चालणं, शेलक शेलक बोलणं.साध्या साध्या बोलण्या मधन , शिव्यांच ते पेरणं||१||
मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – २ वेळा.
पायात चपल कर्रा कर्रा , ...

Why This Colavery ... Di कोल्हापुरी म... मंगळवार, ०६ डिसेंबर २०११, ०५:१४ (+०५:३०)

बाळासाहेब तानवडे मराठी कविता (Marathi Kavita)

मित्रांनो, मी हाय कोल्हापुरी , लई भारी.चला वाजवा.आम्ही कोल्हापूरी .. जगात भारी
मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी - ४ वेळा
रांगड वागणं , बोलणं चालणं, शेलक शेलक बोलणं,साध्या साध्या बोलण्या मधन , शिव्यांच ते पेरण||१||