यादीत किराण्याच्या तारूण्य हरवले माझे;
आणून हसू उसने मी ओठ सजवले माझे.
दो-यास दोष नाही, नसे अपराध कपड्याचा;
अर्जांच्या गर्दीने ह्या खिसे उसवले माझे.
दुरडी रिती बिचारी झोपडीत जागत होती;
सांगून कहाणीला मी पोर निजवले माझे.
भेट तुझी ...
यादीत किराण्याच्या तारूण्य हरवले माझे;
आणून हसू उसने मी ओठ सजवले माझे.
दो-यास दोष नाही, नसे अपराध कपड्याचा;
अर्जांच्या गर्दीने ह्या खिसे उसवले माझे.
दुरडी रिती बिचारी झोपडीत जागत होती;
सांगून कहाणीला मी पोर निजवले माझे.
भेट तुझी ...
शब्दात आग आहे; अर्थात जाळ नाही;
भाषाच कोरडी की तोंडात लाळ नाही़.
पाहून चार किरणे भुलला कसा दिशा तू?
सूर्यास्त होत आहे सध्या सकाळ नाही़.
तू वांझ गाजलेली; आई कसा म्हणू मी?
पान्ह्यात दूध नाही, काखेत बाळ नाही़.
अर्धा उभार फसला आहे नदीत जो तो;
काठावरील म्हणती पाण्यात गाळ नाही़.
रक्तात ...
आजकाल वाटती ना मला खरे दिवस;यायचे कधी प्रिये आपले बरे दिवस.
देहविक्रयावरी रात्र सांज भागवी;थंड बैसला मुका काय हा करे दिवस?
बेगडी प्रकाश अन् बेगडीच सूर्य हा-दाटल्या तमातला आज गुदमरे दिवस
चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा;चालेल जीव गेला,शाबूत नाक ठेवा.
गर्भार दूर हेले, गोठ्यात वांझ गाईचालेल दूध गेले,शाबूत ताक ठेवा.
कर्जात शेत गेले,व्याजात बैल गेले;चालेल चाक गेले,शाबूत आख ठेवा.
तुझ्या गुलाबी ओठांवरती गीत लिहावे ओठांनी;चंद्र असावा मिठीत अन् धुंदीत रहावे ओठांनी.
नाजुक, कोमल, मऊ पाकळ्या तारुण्याने मुसमुसल्या-फूल सुगंधी ओठांचे ते खुडून घ्यावे ओठांनी.
हळूच हसता लख्ख चांदणे अंगावरती ...
आत्मकेंद्री फार झाले खानदानी आरसे;त्यात नाही स्पष्ट आता दु:ख माझे फारसे.
त्या तिथे जन्मोत्सवाला रीघ भारी लागली;एकटे हे फक्त माझ्या वेदनांचे बारसे.
भाषणाने एकदा आभार माझे मानले;पापणीला आसवांचा थेंब कोठेही नसे.
उल्लेख टाळलेल्या आहेत खूप गोष्टी;शास्त्रोक्त गाळलेल्या आहेत खूप गोष्टी.
द्यावा कसा पुरावा नाही ठसा कुठेही;साद्यंत चाळलेल्या आहेत खूप गोष्टी.
डोळ्यात धूर जाता केकाटली स्मशाने-संपूर्ण जाळलेल्या आहेत खूप गोष्टी.
भास झाला तसा, भास नाही खरा;या फुलांना अता वास नाही खरा.
मान टांगू नको रोज फाशीवरी;रेशमाचा कुणी फास नाही खरा.
कोणती राधिका सांग माझी म्हणू?गोपिकांचा इथे रास नाही खरा.
मुक्त होण्यास तू तोडली ना कडी;काय ...
संवेदना जरा ना प्राणात खोल काही;उरली न सापळ्यांच्या रक्तात ओल काही.
बेभाव घाम तैसे स्वस्तात रक्त गेलेअन् कातडीस गो-या आले न मोल काही.
तोंडास काय टाळे लावून बैसला तू;सोसू नको मुक्याने तू आज बोल काही.
तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली;अजूनही तशीच तू तनामनात राहिली.
अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली.
शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे;मधूर ...