होम लोन घ्याव कि नाही ? घेतलं तर किती घ्यावं आणि ते फेडण्याची घाई करावी की नाही यावर नेहमीच साधक-बाधक चर्चा ऐकायला मिळते. यावर ऑफिसमधे लंच-टेबलवर एक चर्चा झाली, त्यातले काही मुद्दे इथे देतोय, अजूनही एक कळत नाही आमच गणित चुकतय कुठं ?
१. घरासाठी कर्ज :
जर १२०० रूपये किमतीचं घर विकत घेण्यासाठी २० वर्षासाठी ११% व्याजदराने १००० रूपये कर्ज घेतलं, तर दरमहा रू. १०.३२ इतका हप्ता ...