मागच्या रविवारी, पिझ्झा, पास्ता वगैरेसारखे इटलीचे खास म्हणता येतील असे खाद्यपदार्थ देणार्या एका उपहारगृहात गेलो होतो. उपहारगृह ठासून भरलेले होते. शाळांना सुट्टी असल्याने उपहारगृहात लहान मुले मुली भरपूर होती. आम्हाला मुष्किलीने बसायला जागा मिळाली. माझी नात(वय वर्षे 5) माझ्या शेजारीच बसली होती. आमच्या मागच्या बाजूला काही चिनी वंशाची (Ethenic Chinese) मुले, मुली बसली होती. त्यांच्या ...