भलतंच बोलताय राव तुमी !
अहो, आम्ही जातीवंत आहोत ! तुम्ही काय आम्हाला आता महाराष्ट्राची ...
भलतंच बोलताय राव तुमी !
अहो, आम्ही जातीवंत आहोत ! तुम्ही काय आम्हाला आता महाराष्ट्राची ...
नुकताच आपण मराठी लिहीणाऱ्या ब्लॉगर्स चा मेळावा घेतला. त्यातील एक महत्वाचा ठराव होता की,
“मराठी साहित्य आजपर्यंत दृक्, श्राव्य आणि लिखीत स्वरूपात उपलब्ध होत आले. बदलत्या माहितीतंत्रज्ञानाच्या युगात ब्लॉगच्या रूपाने या तीनही अंगांचा समावेश असलेला अतिशय परीणामकारक वाङमय-प्रकार प्रसृत झालेला आहे. जगभरातून अदमासे वीस हजाराहून अधीक लेखक नियमितपणे या ...
१) आपले प्रमुख संकेत स्थळ मराठी ब्लॉग विश्व ह्यांना विनंती केली होती पण ते म्हणताहेत,
” नमस्कार सुरेश,
तुमचा कार्यक्रम स्तुत्य आहे. आमचे प्रतिनिधी सध्या पुण्यात नसल्यामुळे (इच्छा असूनही) आम्हाला येणे जमणार नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत.
मात्र या कार्यक्रमाबद्दल माहिती आम्ही जरूर मराठीब्लॉग्ज.नेट द्वारा मराठी ...
श्री अनिकेत व मी एकत्र बसून जो कार्यक्रम ठरवला आहे तो त्यांनी त्यांच्या ” निमंत्रण पत्रिकेच्या “ रुपाने ब्लॉग वर टाकलेला आहेच येथे माझ्या ब्लॉग वर येणाऱ्या साठी मी त्याची फक्त लिंक देत आहे.
http://manatale.wordpress.com/
त्यात नकाशा पण दिला असल्याने कोणास अडचण येण्याचे कारण असू नये. हा पहिलाच अश्या पध्दतीचा मेळावा असल्याने सर्वाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तेव्हा त्या ...
अगदि बरोबर, १९८३ चाच तो काळ होता. भावाने मला कोथरुड चा प्लॉट बघायला पाठवले होते. प्रमुख खूण होती संगम प्रेस ही ! संगम प्रेस जवळ जी विहीर आहे, त्याचे बरोबर उजवीकडे वळून पाचशे पावले गेलॊ की जो दगड पुरलेला दिसेल तो आपल्या प्लॉटचा आग्नेयाचा कोपरा…इ. इ.
त्या काळात अर्ध्या मैलाच्या परिसरात एकही नाव घेण्या सारखी वास्तू नव्हती. त्यामुळे संगम प्रेस शोधायला कष्ट पडणार ...
मराठी ब्लॉगर्स प्रस्थापित मेळावा
मी व अनिकेत सहज गप्पा मारीत असतांना हा विचार मनात चमकून गेला. भुंगा च्या ब्लॉग वर त्यानी काहींची मते मागवली आहेत की ” मराठी ब्लॉगर्स मीट व्हावी का? हो… चांगली आयडिया…!!! ” वगैरे. त्यामध्ये जवळ जवळ माझ्यासकट पंधरा जणांनी व्हावी असे मत नोंदवले होते. मी हाच धागा पकडला होता, व माझ्या पुढे मराठीब्लॉग्स डॉट नेट वर भेटणारी ...
नमस्कार,
मी प्रसन्न जोशी. मुंबईत स्टर माझामध्ये काम करतो. आम्ही ब्लॉग माझा ही स्पर्धा गेली दोन वर्ष आयोजित करतोय. शिवाय, मी आणि काही मित्र पुण्यात माध्यमाईट्स या ग्रुपच्या माध्यमातून ब्लॉगबाबत जागृतीचे काम करतो. आम्हाला तुमच्या ब्लॉगर्स मीटला यायला आवडेल.
कळावे,
प्रसन्न जोशी
श्री. प्रसन्न जोशी,
तुमचा ब्लॉगचा ...
पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा
मराठीब्लॉग्स नेट वर नोंदलेल्या व मराठीत नियमीत लिहिणाऱ्या पुण्यातील ब्लॉगर्सचा एक स्नेहमेळावा येत्या रविवारी दिनांक १० जानेवारी २०१० रोजी संध्याकाळी ४ वाजता , सिंहगड रोड येथील पु. ल. देशपांडे उद्यानात ठरविला आहे.
पु. ल. देशपांडे उद्यान संध्याकाळी ४ ला उघडते. उद्यानाची प्रवेश फी रू ५/- आहे.
पहिल्या ...
अपर्णा ने टॅग केलं, पहील्याने ही काय भानगड समजेच ना, अनेकांना वाट पुसत चाललोय. बघा जमलंय का !
1.Where is your cell phone?
आपटलाय ( बहूतेक भूर्दंड आहे )
2.Your hair?
तेल लावलंय आज ( न्हायलो ना ! )
3.Your mother?
विश्रांती ( वर घेतेय )
4.Your father?
विश्रांती ( अर्थात वरच , जेथे सीता तेथे राघव ! )
5.Your favorite food?
पथ्यंच पथ्य !( कसलं ...
एरव्ही सकाळी साडेपाचला उठणारा मी आज साडे सहा वाजून गेले तरी गादीवर लोळत पडलेलो होतो.कारण काही विशेष नव्हते, तसे कालच थोडेसे फिवरीश वाटत होते पाव गोळी क्रोसीन घेतली होती त्याचा तर परिणाम नसावा ! कोण जाणे?
जाग आली ते मोबाईल च्या कर्णकर्कश्श टोनने. कितीदा मुलगी म्हणत असते, ” बाबा इनकमिंगला छान टोन लावून घ्या ना ! ” पण मी मुलखाचा आळशी. फोन तिचाच होता व ...