सदातृषेच्या वैशाखातीलप्रीतीचा हा अग्नी फुललाप्रेयस माझे मृत्युदेवीहृदय अर्पिले तुझ्याच चरणीचंचलतेचा पर्णपिसारा
प्रत्येक पुस्तक वाचताना येणारा अनुभव वेगळा असतो. अपवाद अर्थातच लेखकरावांनी एकाच लोकप्रिय साच्यामधून काढलेली अनेक पुस्तके. इथेही लेखक कुशल असेल तर दोन घटका खिळवून ठेवतो पण एकदा पुस्तक खाली ठेवलं की त्यातलं फारसं काही आठवत नाही, आठवायचं कारणही नसतं. ग्रिशॅम ते अगाथा ख्रिस्ती यांची पुस्तकं म्हणजे चटकदार भेळेसारखी आहेत. मधून मधून खायला मस्त, पण सकाळ संध्याकाळ नको. ...
आठवतेय तेव्हापासून निरनिराळी झाडं लावतेय. लहान असताना डालडाच्या डब्यात गुलाबाची रोपे, गावठी गुलाबावर विलायती गुलाबाचे रोपण, कलम बांधायचे, डोळे भरायचे. पाचवी ते नववी गुलाबांचे जबर वेड लागलेले मला. ...
निसर्गातील विविध वन्यजीव वेगेवेगळ्या मोसमात नेहमीच दिसत असतात.
प्रत्येक जीवजंतु आपले जीवनचक्र जगत असतो.
हे जीवजंतु वेगवेगळ्या रंगाचे व आकाराचे असतात.
काही हवेत उडु शकतात तर काही ...
आठवडाभराच्या पावसाने खरं म्हणजे पाऊस या शब्दाचाच कंटाळा येतोय. पण तरी शनिवारच्या सकाळी रात्रभर बरसून दमलेला पाऊस थांबतो आणि हवा मस्त कुंद होते. पाऊस नसतो पण तरी दिवस कालच्या पावसामुळे ओलाच वाटतो. ...
टेरॅरियम म्हणजे बरणीतला बगिचा किंवा बंदिस्त काचपात्रातील वाढवलेली झाडे.
लंडनमधील एक आरोग्यचिकित्सक डॉ. नॅथनील वॉर्ड यांच्या हातून अपघातानेच या काचपात्रातील बगिचाचा शोध लावला गेला. डॉ. वॉर्ड यांच्या परसबागेत नेच्यांची खडकबाग (रॉकरी) होती, पण प्रदूषित हवेमुळे ते नेचे मरत होते. डॉ. वॉर्ड फुलपाखरं आणि त्यांचे कोष यांचा अभ्यास करत होते आणि एकदा प्रयोग करतांना ...
दिवाळीत दाराबाहेर रांगोळी काढली जाते. पण तिथे पुरेशी जागा नसल्याने लोकांची ये जा झाली, की बर्याचदा ती रांगोळी पुसली जाते. म्हणून आम्ही घरातल्या एका कोपर्यात छोटीशी रांगोळी काढतो. यावर्षी रांगोळीसाठी गेरू वापरण्याऐवजी, पेनाने व्यवस्थित चौकटी आखलेला कागद तयार केला आणि त्या कागदाला ड्रॉईंगच्या पिना लावून तो पाटावर अडकवून टाकला. मला हवे ते रंगही उपलब्ध होते. म्हणून मग ...