देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गोष्ट

एपिसोड गुरुवार, २९ जुलै २०१०, १३:३७ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

काही संवाद, घटना अन् पात्र

मित्र – असं धार सोडून चालणार नाही…

नायक –  अं??????

मित्र - सगळं काही नीट होईल…

नायक – थोडा ओशाळून… पण… तुला कसं कळलं ??

मित्र – अरे, अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात? अत्ताच शेजारची सुमी भेटली, तिनंच सांगितलं…

नायक- काय????? सुमीलाही कळलं?

मित्र – अरे, शेजारी बेपत्ता झाल्याचं काल लपून राहतं?

नायक – अं??

मित्र – अरे, काकांना शोधायला आम्ही तुझ्या ...

चार स्तंभ रविवार, १८ जुलै २०१०, १६:२४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शाळेत नागरिक शास्त्रात ‘लोकशाहीला म्हणे तीन स्तंभ असतात’ अस होत. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि जो मान्यताप्राप्त नसलेला पण आहे असा चौथा माध्यमे. पण वाटतं का यापैकी कोणी आहे? सगळेच ‘स्तंभ’ आहे की पोटापाण्याचा धंदा? याच उत्तर शेंबड पोरगही देईल. लोकसभा ज्याला हिंदीत ‘संसद’ म्हणतात. मागील महिन्यात बिनबोभाट एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि त्याने ...

कला रविवार, ११ जुलै २०१०, ०३:०२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल रात्री असाचं मित्राशी गप्पा मारत होतो. बोलता बोलता त्याने त्याच्या काढलेल्या फोटोची लिंक दिली. फोटो बघून मी थक्कच झालो. आमचा ‘राज’ उद्धव देखील असेल असे वाटले नव्हते. प्रत्येकात काही ना काही कला अशी असते की त्याचा त्याच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाशी काहीच संबंध नाही. पण कलेत तो एक नंबर असतो. रात्री मित्राचे त्यातील झुणका भाकरीचे फोटो बघून मला जाम भूक लागली होती. मग काय ...

कालसर्पयोग शुक्रवार, ०२ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

मध्यंतरी, तसे आता हे काही नवीन राहिले नाही. एक गुरुजी एका स्थळाला घेऊन घरी आले  होते. मला आई वडिल पुण्यात कधी येतील अस विचारात होते. मी वडिलांना फोन लावून बोलणे करून दिल्यावर माझी कुंडली त्यांनी बघितली. माझी कुंडली दहा पंधरा मिनिटे बघितल्यावर मला म्हणाले, की तुझी रास कर्क, चरण दुसरे आणि पुष्य नक्षत्र. मग तुझी शांती झाली आहे का? मी नाही म्हणाल्यावर एकूणच कुंडली पाहता तुझ्या ...

संकेत बुधवार, १६ जून २०१०, १९:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी ...

मुली आणि मोबाईल मंगळवार, १५ जून २०१०, १६:११ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

या ‘मुली आणि मोबाईल’ म्हणजे ‘दो जिस्म एक जान’ आहेत. कुठेही बघा, या कायम त्या ‘मोबाईल’वरच. सकाळी कंपनीची लेट मोर्निंगची बस चुकली. पीएमपीएल च्या डब्यात बसलो. डांगे चौकात बस थांबली. झालं! तो बस चालक गळा फाडून पुढच्या दारातून चढू नका म्हणून ओरडत होता. पण ऐकतील तर मुली कसल्या? माझ्या समोर एक आणि बाजूला दोन अशा मुली उभ्या. यार ह्या मुली एवढ्या सुंदर का असतात? बस निघून दोन एक मिनिटे नाही ...

नांदा सौख्य भरे? मंगळवार, २५ मे २०१०, ००:४१ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

पूर्णपणे दिशाभूल करणारं शीर्षक टाकून झाल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो एक कहाणी.

दोन वर्षं झाली, दोघं सुखानं नांदत होते. यांचं फिस्कटेल अशी बाहेरच्या कोणाला पुसटशीही शंका आली नसती. चारआठ महिन्यांपूर्वी म्हणायला जरा घुरघुर, गरमागरमी झाली होती पण ते केवळ जवळच्यांनाच माहीत. परिस्थिती बदलली आणि ही घुरघुर कमी झाली. एकूणच प्रकरण निवळलं म्हणायला हरकत नव्हती. पण अचानक परवा ...

नांदा सौख्य भरे? मंगळवार, २५ मे २०१०, ००:४१ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

पूर्णपणे दिशाभूल करणारं शीर्षक टाकून झाल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो एक कहाणी.

दोन वर्षं झाली, दोघं सुखानं नांदत होते. यांचं फिस्कटेल अशी बाहेरच्या कोणाला पुसटशीही शंका आली नसती. चारआठ महिन्यांपूर्वी म्हणायला जरा घुरघुर, गरमागरमी झाली होती पण ते केवळ जवळच्यांनाच माहीत. परिस्थिती बदलली आणि ही घुरघुर कमी झाली. एकूणच प्रकरण निवळलं म्हणायला हरकत नव्हती. पण अचानक परवा ...

सर्दी रविवार, २३ मे २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा पासून ही सर्दी जाम मागे लागली आहे. बर सर्दी झाली ती सुद्धा उन्हाळ्यात. तसे मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी पडलो. अंगात जीवच नसल्याप्रमाणे वाटत आहे. काल दिवभर झोपून होतो. सर्दीमुळे थोडा खोकला आणि आवाजात बदल झाला. माझ्या डोळ्यात पाणी आले तरचं सर्दी होते. नाहीतर कितीही पाऊस असला तरी काही फरक पडत नाही. एकतर ‘मिनी आठल्ये’ पुन्हा आपआपल्या घरी गेल्यापासून जाम एकटेपणा जाणवतो आहे. ...

चष्टगो-३ रविवार, ०२ मे २०१०, २३:५२ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

आ वासून बघणाऱ्या सशाला आता काय सांगावं असा मोठा प्रश्न अंघोळ्यापुढे पडला होता. बरं खोटा पासवर्ड तीन वेळा सांगितला तर सशाचं अस्वलात रुपांतर होऊन उघडणाऱ्यांच्या मागे लागतं मग काही धडगत नाही… आजून थोडा वेळ उघडं ठेवलं तर हा ससा स्वतःहून दार लाऊन घेतो म्हणे.

जाम चिडलेले असतात हे ससे. सहाजिकच आहे. कोणी कपाटाला कळीचा शब्द लावेपर्यंत हे जंगलात निवांत चित्तानं आपले “ससुले उद्योग” ...