देवनागरी
Roman
Press F12 to toggle

जीवन

अडकणारं आणि उडणारं शुक्रवार, २१ जानेवारी २०११, ०२:२५ (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

खिडकीतून एक अतिशय सुंदर पतंग पाहिला, तारांमध्ये अडकलेला, त्याची दोरी लोंबकळत होती, जशी एखाद्या हाताची प्रतिक्षा करत आहे. मला माझ्या मनाला समजवावं लागलं की, तो पतंग जीवंत नाही! पण तरीही त्याची प्रसन्नता आणि सुंदरता पाहून माझं सहज मन ही गोष्ट मानायला तयार होत नव्हतं. मनात एक असाही विचार आला, ज्या मुलाचा हा पतंग अडकला असेल, तो मनातून रुसला असेल ना! कदाचीत नशिबावर! ...

अदृष्य अश्रू गुरुवार, १३ जानेवारी २०११, १४:१० (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

कधीकधी आपलं अस्तित्त्व हे स्वतःसाठी आणि दुसर्‍यासाठी सुसह्य नाहीये, असं जाणवू लागतं, तेंव्हा या जगातून, जीवनातून ‘अदृष्य’ होऊन जावंसं वाटतं. ‘मरावंसं’ वाटतं, असं मुद्दाम म्हणत नाहीये, कारण त्या शब्दात यातना आहेत. मला स्वतःसहीत कोणालाही यातना द्यायच्या नाहीयेत ..कारण हाच तर निघून जाण्यामागील खरा उद्देश आहे.. मला मरताना त्रास होत असेल आणि माझ्यामागे कोणी रडत असेल, तर ते आजिबात ...

वाया वेळ गुरुवार, ०६ जानेवारी २०११, २२:०७ (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

आजचा दिवस तसा निरर्थकच म्हणावा लागेल. असे दिवस माझ्या मनाला मोठी हुरहुर लावून जातात. स्वप्नांच्या दिशेनं काहीही नवं घेऊन न येता, आपण काळात पुढे आलो आहोत, ही जाणिवच मूळात माझ्या मनाला रुचत नाही. हेऽ ना! एखादा चेंडू नुसता आडवून त्यावर कोणतीही धाव न घेण्यासारखं आहे! आज मैदानावर भारतीय संघ जे करत आहे, त्याच दिशेने माझा प्रवासही सुरु आहे. नुसतेच चेंडू खेळत राहून वेळ घालवायचा, आणि ...

तुच सांग आठवण आली की काय करायचे मी मंगळवार, २१ ऑक्टोबर २००८, १०:१४ (+०५:३०)

mitali deshmukh "तुमची लाडकी वाहिनी"

सागं आठवण आली की काय करायचे ? नाते तुझे हळुवार जपायचे , आठवण आली की अलगद उमलायचे , नको करूस अट्टाहास , सांग कधी भेटायचे , दरवेळी ...

अपघात - असा आणि तसा गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, १९:३२ (+०५:३०)

स्वगत्

नुकत्याच दोन बातम्या वाचनात आल्या. म्हटलं तर सारख्या, म्हटलं तर वेगळ्या.

बातमी क्र. १ (टोकियो, जपान) - Tokyo Big Site ह्या बहुपयोगी प्रदर्शन केन्द्रामधे पहिल्या मजल्यापासुन चौथा मजला जोडणारा एक सरकता जिना (escalator) अचानक थांबला, आणि हळुच थोडा खाली सरकला. त्यामुळे त्यावेळी जिन्यावर असलेल्या शंभराहुन अधीक लोकांपैकी अनेक जण धड्पडले. ह्या गडबडीत १० जणांना किरकोळ मुकामार तर १ ...

जीवन. गुरुवार, ०१ मे २००८, २२:५९ (+०५:३०)

Dinesh Gharat मराठी म्हणी, वाक्प्रचार

" माझ्या वडिलांनी एकदा सांगीतलं, " सार जग डावीकडे जात असेल अन तुला उजवीकडे जावस वाटत असेल तर तु उजवीकडे जा. ...

जीवन शुक्रवार, १५ फेब्रुवारी २००८, १८:४३ (+०५:३०)

आशा जोगळेकर झु ळु क

असंच असतं जीवन
ते उगवतं फुलतं फळतं
मातीत मिसळतं परत परत
परत नव्यानं उगवायला

नव्यानं उगवतं अधिक शक्ती घेऊन
नवीन गुणचिन्ह रुजवायला
होत जातं अधिक अधिक छान
अधिक अधिक शक्तिवान

जीवन बुधवार, ०९ मे २००७, १९:११ (+०५:३०)

आनंद माने पारिजात..

"जो त्या क्षणी उत्कटपणे आकंठ जगला त्याला नंतरच्या आयुष्यातल्या अनेक तापदायक क्षणांना सुसह्य करता येतं.
निरपेक्ष प्रेमानं काही व्यक्ती आपलं जगणं समृध्द करून जातात , पुढे आपण त्याच पुंजीवर जगत असतो "- प्रविण दवणे. (" अत्तराचे ...