देवनागरी
Roman
Press F12 to toggle

दुःख

आयुष्य………….. (कवी अज्ञात) गुरुवार, ०२ फेब्रुवारी २०१२, ०९:०० (+०५:३०)

anuvina अनुविना

आयुष्य………….. आज म्हटल आयुष्य विणायला घेउया जमतय का ते बघुया वाटल अगदी सोप असेल रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे एक ...

दुःखवर्णनाचे वर्णन- शेवट शुक्रवार, २७ जानेवारी २०१२, २१:०८ (+०५:३०)

आल्हादक प्रतिबिंब!

दुःखवर्णनाचे वर्णन- सुरूवात

दुःखवर्णनाचे वर्णन- मध्य

 

दुःखवर्णनाचे वर्णन- शेवट

तो शब्द भेटला पाहिजे

होय, भेटलाच पाहिजे
हाडामांसाच्या माणसासारखा

दुःखाचं वर्णन तो करणार नाही
ते अनुभवल्यानंतर त्याला ते जमणारही नाही
पण तो एक करेल, खरं बोलेल
प्रामाणिक बोलेल.

त्याचा खरेपणा दुःखाला
न्हाऊ माखू घालणार नाही
दुःखाच्या डागण्या मात्र ...

दुःखवर्णनाचे वर्णन- मध्य गुरुवार, २६ जानेवारी २०१२, २०:३४ (+०५:३०)

आल्हादक प्रतिबिंब!

दुःखवर्णनाचे वर्णन- सुरूवात

 

दुःखवर्णनाचे वर्णन- मध्य

तो तडफडता शब्द
गप्प बसत नाही
धुंडाळतो आजूबाजूचं जग
कानोसा घेतो
समृद्ध होत रहातो
दुःखकाळ्या श्वासांनी
खारट अश्रूंनी
हरलेल्या मनगटागत
थरथरत रहातो…
तडफडत रहातो…
कायम

मग एक वेळ येते
हो तीच वेळ येते
त्या शब्दाला,
(आता निव्वळ शब्द राहिलेला नाही तो!)
बाहेर काढण्याची

पण ...

दळण रविवार, ०८ जानेवारी २०१२, २२:३६ (+०५:३०)

आल्हादक प्रतिबिंब!

दळण तेच दळत रहातं
जातं फक्त बदलत रहातं
कधी जाणूनबुजून
कधी सहज आपोआप
कधी दुःखाच्या आवेगात
कधी सुखाच्या सृजनात

दळणात
जात्यात टाकल्याटाकल्या लगेच
चिरडून कुणीच निघत नाही
पण जातंच ते… न चिरडून निघता येईल का?

“प्यार व्यार सब अपनी जगह ठिक है
दुख होता है जब लोग बदल जाते है”

दळणही तेच
हव्याहव्याशा असणार्‍या नातेसंबंधांचं
जातं बदलत रहातं

देवा... तु असं का केलं??? गुरुवार, ०६ ऑक्टोबर २०११, १७:०८ (+०५:३०)

नागेश देशपांडे मी एक हौशी लेखक

पहाटे तीन वाजता एका आवाजामुळे जाग आली, किती वाजले हे बघण्यासाठी उश्या खालचा मोबाईल घेतला तर स्क्रीनवर एक मेसेज दिसला... R.I.P. Steve Jobs... क्षणभर विश्वास नाही बसला. वाटलं कोणीतरी मस्करी करत असेल म्हणून पुन्हा झोपी गेलो.

सकाळी उठून पुन्हा मोबाईल पाहिला, न्यूज चॅनल पाहिले तेव्हा पुर्ण बातमी समजली. एक महान उद्योजक, संगणक अभियंता स्टीव्ह जॉब्सचे "कर्क" रोगाने निधन झाले.

एका सुजलेल्या शहरात… गुरुवार, १३ जानेवारी २०११, ११:०२ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

प्रयत्नांचे सिग्नल तोडत
नशीबाला साथीला घेत
धूळभरल्या हवेत
अश्रू झालेत चिकार

एका सुजलेल्या शहरात
दुःख फिरतंय बाईकवरून रंपाट

एका सुजलेल्या शहरात
फ्ल्यायओव्हरचं काम
मूठभर कारवाल्यांसाठी
आयुष्याचं दाम

पिलर एखादा तुटू दे
इन्शुरन्स क्लेम मिळू दे
पांढर्‍याशुभ्र झब्ब्याखाली
फक्त मन नसू दे ...

खूप दुखतय रे! शनिवार, १३ नोव्हेंबर २०१०, १८:०१ (+०५:३०)

Tushar Joshi, Nagpur तुषार जोशी, नागपूर

.

बाबा...
बोट दुखतय रे
बाबा
खूप दुखतय रे
.
काय झालं बेटा
बोट भाजल का?
तुला सांगितलंच होत ना
कढईला हात लावू नकोस म्हणून.
.
बाबा
खूप दुखतय रे
हो ग बेटा
मी फुंकर घालून देतो
.
पण ते थोडं दुखणारच बरं
मी पाठीशी आहे
पण तुझं दुःख तुलाच
जगायचय बरं

बाबा...
हृदय दुखतय रे

शरीरांच्या कविता- नातं सोमवार, २८ डिसेंबर २००९, ००:५४ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

नातं

सुखाचं दुःखाशी नातं काय?
माझं तुझ्याशी नातं काय?
शून्याचं एकाशी नातं काय?

सुखाचं दुःखाशी नातं, एकमेकांपुरतं
माझं तुझ्याशी नातं, शरीरापुरतं
पण शून्याचं एकाशी नातं?

नातं गोल गरगरीत शून्यापुरतं?
की एकटेपणापुरतं?
हे नातं ’शून्य एक’ आणि ...

नशीब सोमवार, २६ ऑक्टोबर २००९, १८:१५ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

का कोणाला कळत नाही
‘नशीब’ एक पळवाट असते
निश्चयाला श्रमाची जोड़ असल्यावर
‘नशीब’ ही  बदलता येत असते…

आयुष्यात जिंकत असताना नेहमीच
कर्तुत्वाचा मोठेपणा मिरवला जातो
तोच डाव ...

अभ्र रविवार, २४ मे २००९, २२:३९ (+०५:३०)

आशा जोगळेकर झु ळु क

कुठुनि अभ्र आले,
नभ, झाकोळुनि गेले
सूर्याचे तेज कसे
मंद मलूल झाले ।

मन फ्रफुल्ल होते ते
क्षण भरांत विझले
स्मित गालावरचे
जणु मावळून गेले ।

अपुल्या मधि जे घडले
किति सुंदर होते
फक्त एक ...