देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सामाजिक

१११. संशयाचा फायदा मंगळवार, ३१ जानेवारी २०१२, २३:४२ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

“तुमच नाव काय?” फोनवरचा अपरिचितआवाजातला प्रश्न ऐकून मी दचकते.मी त्या प्रश्नाच उत्तरद्यायला तयार नाही फारशी – स्वाभाविकच. म्हणजे प्रश्न काही तसानवा नाही. अनेकदा याच उत्तर द्याव लागत. आणि स्वत:च नाव लपवून ठेवण्यात मलास्वारस्य नाही. पण आत्ता मी फोन लावते आहेतर तो दुस-याच कोणाकडे गेला आहे. मला वाटत नेहमीसारखी ‘क्रॉस- कनेक्शन’ची ...

मालक मराठ्याला गुलाम "कुणबी" ... शनिवार, २१ जानेवारी २०१२, २२:०२ (+०५:३०)

Sanjay Sonawani संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

"कुणबी प्रमानपत्र मिळते मार्गदर्शक तत्वानुसारच" या शिर्षकाखाली आजच्या पुणे टुडे मद्धे अखिल भारतीय मराठा महासंघाने स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणामागे कालच्याच सकाळमद्धे प्रसिद्ध झालेल्या श्री क्रुष्णकांत कुदळे यांनी मराठा असुनही कुणबी असल्याची प्रमाणपत्रे घेत ओबीसीच्या ताटातील घास उचलण्याबाबत टीका केल्याचा संदर्भ होता.

प्रश्न असा आहे अखिल भारतीय मराठा ...

मैत्रिण.. शनिवार, २१ जानेवारी २०१२, १०:४४ (+०५:३०)

महेंद्र काय वाटेल ते........

परवा नागपुरला गेलो होतो, माझी एक लहानपणीची ( की पंचविशीत असतांनाची?) मैत्रीण रस्त्याने जातांना दिसली. सुखवस्तू पणाचं सुख ...

१०९. इडली आणि पनीर बुधवार, १८ जानेवारी २०१२, २३:२४ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

‘तू जाशील का चेन्नैला एका सेमिनारसाठी’अस मला विचारलं, तेंव्हा मी लगेचच तयार झाले. चेन्नैला जायची संधी आली की मी एकापायावर तयार असते. तशी या शहरात मी एखाद्या रात्रीपुरता मुक्काम वगळता फारशी कधीराहिलेली नाही. पण अनेकदा कन्याकुमारीला जाण्यासाठी मुंबईहून थेट तिकीट नाहीमिळालं; की चेन्नैला यायच आणि पुढची गाडी पकडायची असा खात्रीचा पर्याय असायचा.पुदुच्चेरीला जायची ...

अस्वच्छ भारत शनिवार, १४ जानेवारी २०१२, २१:५१ (+०५:३०)

Sagar Kokne माझ्या मनातले काही

समस्या तर तशा खूप आहेत जगात. सगळ्याच काही माणसाला वैयक्तिक पातळीवर सोडवता येणे शक्य नसते. पण माणूस प्रयत्न करू शकतो आणि खासकरून तेव्हा, जेव्हा या समस्या त्याच्याच चुकांमुळे उद्भवल्या असतील.

मुंबईसारख्या शहरात कधी घराबाहेर पडलो आणि डोक्यातील इतर सर्व विचारचक्रे थांबवून कधी आपल्या शहराचे निरीक्षण केले तर लक्षात येईल कि जिथे-तिथे कचराच कचरा आहे. कचरा जो लक्ष नसेल ...

१०८. उदघाटन गुरुवार, १२ जानेवारी २०१२, २३:२१ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

“नमस्कार”एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले. “कोण आहेत हे?”मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारल. “अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.”त्याने आश्चर्याने मला न्याहाळतसांगितलं.
मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजल. त्यामंडपात आम्ही ...

१०६. धागा शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, २१:१२ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

“आमच्या कमिटीचा एक फोटो काढता का?”एका वृद्ध सरदारजींनी मला विचारलं.मी फोटो काढला.
मी गावातल्या माणसांचे फोटो काढते तेव्हा त्यांना ते लगेच दाखवते – तसाच हाहीदाखवला. ते सगळे खूष झाले एकदम.आजोबांनी तर मला ‘देव तुझ भलं करो’ अशा थाटाचा आशीर्वादही दिला. “हा फोटो मी तुम्हाला कसा ...

महार कोण होते?- उद्गम-संक्रमण-झेप गुरुवार, २९ डिसेंबर २०११, ०८:५२ (+०५:३०)

Sanjay Sonawani संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

माझे "महार कोण होते?- उद्गम-संक्रमण-झेप"हे पुस्तक प्रकाशित झाले असुन आता ते सर्वत्र उपलब्ध आहे.

वर्णव्यवस्था ज्या पुरुषसुक्तामुळे दैवी आणि जन्माधारीत बनली तेच मुळात ऋग्वेदात कसे प्रक्षिप्त आहे हेही यात सिद्ध केले आहे.

या पुस्तकात महारांचा गौरवशाली इतिहास सांगितला असुन महार शब्दाची नव्याने उपपत्ती मांडली असुन ती सर्वमान्य व्हावी अशीच आहे.

याशिवाय ...

देता देता एक दिवस..... बुधवार, २८ डिसेंबर २०११, ०५:०८ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

ट्रेसीची माझी ओळख मागच्या वर्षी उन्हाळ्यातली, ती माझ्या समोरच्या अपार्टमेंटमध्ये राहायला आली तेव्हाची.खरं तर तेव्हा तिच्यापेक्षा तिच्या सासूबरोबर जास्त बोलले होते मी..मला वाटतं ओरेगावच्या कुठल्यातरी ...

मुस्लीम आरक्षण: काही विचार रविवार, २५ डिसेंबर २०११, २०:५९ (+०५:३०)

Sanjay Sonawani संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

मुस्लिमांना साडेचार टक्के आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार दिसत आहे व त्यावर सध्या वादंगही होत आहे. प्रा. हरी नरके यांनी याबाबत तात्काळ लेख लिहुन ही चाल ओबीसींत फुट कशी पाडु इच्छिते यावर दै. सकाळमद्धे लिहिलेच आहेत. माझे विचार असे आहेत:

१. ओबीसी असणारे मुस्लिम फक्त भारतातच आहेत. इस्लामला खरे तर मुळात जातीप्रथा मान्य नाही. या ओबीसी मुस्लिमांनी आपण मुस्लिम नसल्याचे जाहीर कबुल ...