देवनागरी
Roman
Press F12 to toggle

education

शिस्त लावण्याचे उपाय - शैक्षणिक गुणवत्त... मंगळवार, १९ मार्च २०१३, ०८:३५ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

विद्यार्थ्यांना "शिस्त लावता येण्याचे' काही तंत्र आहे का?
विद्यार्थ्यांच्या "बेशिस्तीची' विविध कारणे आपण ह्या आधीच्या नोंदीमध्ये थोडक्यात पाहिलेली आहेत. 'Discipline' ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ शिकणे असा होतो. (Disciple = शिष्य). त्यामुळे शिस्त ही ‘लावण्याची' गोष्ट आहे हे अर्वाचीन आणि प्राचीन विद्वानांना पटते आहे असे दिसत नाही. शिक्षकाची भूमिका 'अधीक्षका'ची झाली त्यामुळे लष्करी शिस्तीची ...

शालेय नेतृत्व सोमवार, १६ जुलै २०१२, १९:४३ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

"शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ऊर्जेचा विनियोग समान शैक्षणिक उद्दिष्टांसाठी व्हावा ह्या दृष्टीने सुरू असलेली व्यवस्था म्हणजे शालेय नेतृत्व' अशी विकिपीडियाने शालेय नेतृत्वाची सुंदर व्याख्या केलेली आहे.

"योजकस्तत्र दुर्लभः' ह्या उक्तीप्रमाणे हे सारे घडवून आणणारा समर्थ मुख्याध्यापक लाभणे हे शाळेचे खरे भाग्य असते. हल्ली मुख्याध्यापकाचे पद ...

वर्गपाठ किंवा गृहपाठ कसा द्यावा? मंगळवार, १७ मे २०११, १०:२७ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

सर्वसामान्य शाळांमधून संमिश्र क्षमतेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग केलेले असतात. ह्या विभिन्न क्षमतेच्या मुलांना एकाच तासिकेत शिकवण्याची कसरत शिक्षकाला करावी लागते. विशेष वर्ग घेतल्याखेरीज विद्यार्थ्यांना क्षमतानिहाय गटांमध्ये शिकवणे शक्य नसते.

परंतु स्वाध्याय देताना शिक्षकांना असे स्वातंत्र्य घेता येणे शक्य आहे. Assignment Tiering च्या तंत्राचा विचार आणि उपयोग शिक्षकांनी ...

मुलांनी काढलेली चित्रे - शैक्षणिक गुणवत... बुधवार, ०१ सप्टेंबर २०१०, १४:५८ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

मुलांनी हुबेहूब चित्रे काढण्यास शिकावे म्हणून हल्ली लहानपणीच त्यांना खास शिकवण्या लावल्या जातात. हे योग्य आहे का? की मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे निरर्थक चित्रे काढू द्यावीत?

पालकांनी (आणि शिक्षकांनीही) हे समजून घ्यायला हवे की चित्रकला म्हणजे शारीरिक कसरत किंवा कौशल्य (कारागिरी) नव्हे. आत्मप्रकटीकरणाची ती एक पद्धत असून तिचे स्वतःचे असे तर्कशास्त्र आहे.  ...

बालमानसशास्त्रातील काही आधारभूत संकल्पन... बुधवार, १८ ऑगस्ट २०१०, २०:०२ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल?

हा खूप व्यापक प्रश्न आहे. केवळ कायदे करून हे घडणार नाही. कायद्याच्या निमित्ताने प्रश्नाकडे लक्ष वेधले जाते हे खरे आहे पण तितके पुरेसे नाही. प्रत्यक्ष काम शैक्षणिक संस्थांनाच करावे लागणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी बालक, पालक आणि शिक्षक अशा तिन्ही घटकांचा विचार अभिप्रेत आहे. यापैकी बालक ...

अमूर्त कल्पना आणि प्रश्न समजून घेण्याची... रविवार, ०४ जुलै २०१०, १०:०१ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

शालेय वय होण्याआधी लहान मुलांना प्रश्न विचारणे योग्य आहे का?   

अध्ययनप्रक्रियेत आत्मकेंद्री स्वभावावर मात करून सामाजिक सुसंवाद साधणे का आवश्यक आहे हे आपण पाहिले आहे. लहान मुलांच्या आत्मकेंद्री स्वभावामुळे ज्ञानग्रहणात अडथळे येतात हे पिआजे ह्यांचे म्हणणेही आपण ह्या अगोदर पाहिले आहे. ह्या म्हणण्यास वायगोत्स्की ह्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते अमूर्त ...

बालमानसशास्त्र आणि अध्ययनप्रक्रिया - शै... गुरुवार, ०१ जुलै २०१०, २०:४२ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

लहान मुले शिकतात म्हणजे काय होते? बालमानसशास्त्रातील आधारभूत संकल्पना आणि लहान मुलांच्या शिकण्याचा काय संबंध आहे?
शिकणे म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता येणे. विचारांची किंवा क्रियांची मालिका कशी असावी हे एखादे मूल (किंवा व्यक्ती) तर्कशुद्ध विचारातून ठरवू शकते. असा विचार करण्याची क्षमता सामाजिक सुसंवादातून साध्य होते. मुले एकमेकांशी किती बोलतात, ...

बेशिस्तीची कारणे - शैक्षणिक गुणवत्ता प्... शनिवार, १४ नोव्हेंबर २००९, २२:४८ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणे कोणती ?

ह्या प्रश्नाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे लहान लहान भाग करून त्याचा विचार करू. बेशिस्त नेमके कशाला म्हणावे यापासून सुरुवात आहे. सध्या त्या विषयात न शिरता त्यावर सर्वसाधारण एकमत आहे असे समजूया. कारणे अनेक प्रकारची आहेत. बेशिस्तीला कारण कोण आहे यावर कारणे कोणत्या प्रकारची आहेत हे ठरते.

विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीला ...

वर्गातील शिस्त : शैक्षणिक गुणवत्ता प्रश... सोमवार, २१ सप्टेंबर २००९, ११:१७ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

शैक्षणिक गुणवत्तेसाठी वर्गात शिस्त राखणे अनिवार्य नाही का? बदलत्या सामाजिक परिस्थितीत अशी शिस्त राखणे शिक्षकांना किती शक्य होते?

हा प्रश्न सध्याच्या काळात जास्त तीव्र झालेला आहे असे वाटत असले तरी तो सार्वकालिक आहे. काळानुरूप प्रश्नवेगवेगळ्या भाषेत व्यक्त होत आलेला आहे. शिक्षकाने समंजस असण्यावर भर वाढत गेला तसतशी ही भाषा बदलतगेली आहे.

आधी वर्गातील "शिस्त' ...

अध्ययनाच्या प्रेरणा : शैक्षणिक गुणवत्ता... सोमवार, १४ सप्टेंबर २००९, १४:०७ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

प्रश्न : अध्यापनाचे धोरण शैक्षणिक गुणवत्तेला पोषक राहण्यासाठी काय करावे?

उत्तर : एखाद्या विषयाचे अध्यापन करणे म्हणजे केवळ त्या विषयाचे पाठ्यपुस्तक शिकवणे इतकेच नाही. तो विषय विद्यार्थ्याला आपणहून शिकता येईल अशा क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित करणे महत्त्वाचे आहे. स्वतःहून एखादी गोष्ट शोधून काढण्यात मुलांना मिळणारा आनंद खूप मोठा आहे. आईने हातांमध्ये लपवलेला ...