देवनागरी
Roman
Press F12 to toggle

General

‘ती’ – ४ शुक्रवार, १३ जानेवारी २०१२, ००:०२ (+०५:३०)

गुज मनीचे...

‘ती’ माझ्या आयुष्यात असुन नसल्यासारखी…माझी तिची एकच भेट.. ती देखील ओझरती…मी शाळेतुन घरी जात होते आणि तेवढ्यात ती मला माझ्या आत्येभावबरोबर दिसली. दादा बोलायला थांबला, अगदी २ मिनिटे. तिच्या चहर्‍यावर फक्त स्मितहास्य! ६वीत होते मी…
 
‘ती’ त्याची प्रेयसी! थोड्याच महिन्यात कळले की त्यांनी लग्न ठरवले आहे. BSc. नंतर दादा पुण्याला cओम्पुतेर च cओउर्से करत होता. सुट्टीत तो घरी आला की ...

‘ती’ – २ बुधवार, २३ नोव्हेंबर २०११, २३:१५ (+०५:३०)

गुज मनीचे...

तिच्या विषयी लिहायला घेतलं खरं पण नक्की कुठून सुरुवात करु आणि काय काय लिहू असे झाले क्षणार्धात…’ती’ माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व!
 
तिचे माहेर सिंधुदुर्गातले छोटेसे खेडे ‘पोईप’ आणि तिला दिले देवगडच्या ‘हिंदळे’ गावात. लग्नानंतर ती मुंबईत आली असावी. मुंबईच्या चाळींमधे जसे अनेकांनी संसार केले तसा हिने सुद्धा. ती तिथेच थांबली नाही. चेंबुरच्या हाऊसिंग ...

‘ती’ – भाग १ : बेगम बुधवार, १६ नोव्हेंबर २०११, ०५:०५ (+०५:३०)

गुज मनीचे...

थोडक्यात – स्त्रीच्या विविध रूपाने मी अगदी भारावून जात आलेय. ती कोणी एक स्त्री नाही. तिच्या अनेक प्रतिमा, अनेक चेहरे, अनेक छबी. आज वर आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर ‘ती’ निरनिराळ्या स्वरूपात भेटत आली. आणि त्या-त्या वेळी तिने ह्रुदयाला स्पर्श केला.

कधी मैत्रिण म्हणून, कधी कामवाली बाई म्हणून तर कधी अजून कोणी. कधी मला ‘ती’ ची दया आली, कधी आवडली, कधी भावली, कधी रागही आला असेल तिचा, पण ...

एका स्वप्नाची पूर्ती! मंगळवार, ०९ ऑगस्ट २०११, २१:४८ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

कालचा दिवस भाग्याचा!
नविन घराचा ताबा मिळाला. पुण्यात घर व्हावे ही एका तपापासूनची इच्छा…ते स्वप्न आज सत्यात उतरले.

भाऊ, बहिण, आई यांनी घराचा ताबा घेतला. गुरुजींना बोलावून गणेशपुजन केले. संध्याकाळी माझ्या जवळच्या मैत्रिणी आल्या होत्या. मी विडियो-चॅटवर घर पाहिले, सगळे बघत होते, सर्वांशी बोलले. खूप आनंद झाला. माझ्या आईने व बहिणीने घरीच पाव-भाजी केली.

माझ्या आईच्या ...

पावसाच्या पहिल्या सरीत… बुधवार, २५ मे २०११, ०१:०८ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

पावसाच्या पहिल्या सरीत…..
अंगणात जाऊन बागडायचं
मनातल्या भावनांना
ओलं चिंब भिजवायचं

तप्त धरा शांत करायला
पाऊस वाटे हवा हवा
अंग-अंग मोहरुन टाकी
हवेतला हा गारवा

पाण्यात भिजवून
मनं करायचे बेधुंद
अन् श्वासांमध्ये साठवून घ्यायचा
मातीचा सुगंध

पावसाच्या पहिल्या ...

हापूस शुक्रवार, १३ मे २०११, ००:२७ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

माझा जन्म रत्नागिरीचा. त्यामुळे ‘हापूस’ या फळाशी माझे तेव्हापासून चे नाते. त्याचे (जन्माचे नव्हे हो, हापूस चे) बरेच वर्ष मला काही कौतुक वाटायचे नाही. चुकीचा समज करुन घेऊ नका. कौतुक नाही  म्हणजे – लहानपणापासून ‘हापूस’ हा इतका बघायला (आणि खायला) मिळाला की त्याबद्दल अप्रुप वाटायचे नाही.

अप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून हळूहळू आंब्याचे बाजारात आगमन व्हायचे. सुरुवातीला भाव ...

१३१८, शुक्रवार पेठ बुधवार, ०६ एप्रिल २०११, ०२:३२ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

शेवडे बोळातला फ्लॅट ही तात्पूर्ती सोय होती. महिन्या अखेरीला तो फ्लॅट सोडून नविन जागेत जायचे होते.त्या आधी नविन जागा शोधायचा खटाटोप होता. महिनाभर सकाळ-संध्याकाळ नविन जागेच शोध हाच उद्योग होता माझा आणि प्रज्ञाचा. बोळात १-२ ठिकाणी सांगून ठेवले होते की कोणाला कुठे पेईंग गेस्ट हव्या आहेत असे कळले तर आम्हाला सांगा. काही एगंटस् ना पण भेटून आलो. असे करत करत महिना संपत आला पण जागेची ...

सारे जहाँ से अच्छा… बुधवार, २६ जानेवारी २०११, ०४:५३ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिवस. लहाणपणी हा दिवस म्हणजे परवणीच वाटायचा. सकाळी लवकर, मस्त शुभ्र युनिफॉर्म, कॅनवास चे शूज घालून शाळेत झेंडा वंदन करायला जायचो. शाळेत वेगळेच वातावरण असायचे. देशभक्तिपर गीते मोठ्याने वाजत असायची. NCC  विद्यार्थींचे मार्चिंग परेड व्हायची. विशेष अतिथींच्या हस्ते झेंडा वंदन व्हायचे. काही सांस्क्रुतिक गाणी आणि कार्यक्रम व्हायचे. देश प्रेमाने ऊर अगदी ...

सोमवारी सकाळी तुम्हाला काय वाटते ? सोमवार, १६ ऑगस्ट २०१०, ०६:३४ (+०५:३०)

rajdharma राजधर्म यांची अनुदिनी

सोमवार आला की मला माझे लहानपणचे दिवस आठवतात. शाळेत जायचा वैताग आला की मला चक्कर यायची, पोट दुखायचे, आणि बरेच काय काय होत असे.
आज देखिल सोमवारचा दिवस उजाडला की मला लहान मुलासारखे काहीतरी कारण सांगुन घरी बसावेसे वाटते. सोमवारी कामावर जायचे अगदी नकोसे वाटते. मात्र एकदा कामावर गेल्यावर सगळा आळस पळून जातो हे ही तितके खरेच.

आज प्रत्येकजण शिक्षणाचे महत्त्व सांगू लागला आहे. मराठी ...

सांगा कसं जगायचं? गुरुवार, २९ जुलै २०१०, ०२:२१ (+०५:३०)

Ruhi गुज मनीचे...

महिन्याच्या सुरुवतीला ‘सोमरविल’ ला जाऊन काही फर्निचरची ऑर्डर देऊन आलो. डिलीवरीला २ आठवडे लागतील असे दुकानदार म्हणाला. म्हणजे अंदाजे १८-१९ तारीख उजाडेल असा आम्ही अंदाज केला. हा-हा म्हणता २३ तारीख उलटून गेली आणि आम्ही वैतागलो. साधा एक फोन नाही त्या दुकानातून. शेवटी ‘अडला हरी….’ स्मरुन आम्हीच फोन करुन त्याला खडसावले की आम्ही ऑर्डर कॅन्सल करतोय. दुकानातला मेन माणूस जाग्यावर ...