देवनागरी
Roman
Press F12 to toggle

राजकारण

मंडुकोपनिषद बुधवार, ०१ फेब्रुवारी २०१२, २२:३० (+०५:३०)

विक्रम वालावलकर. विचारप्रवाह ~ विक्रम वालावलकर

निवडणुकांचा मोसम आला...पडघम वाजू लागले...काही दिवसांनी मतदानाचा पाउस पडेल...हिरवे गवत उगवेल नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे आणि लुसलुशीत कुरणे तयार होतील...पुन्हा नव्याने चरायला...

मला माझ्या रुपारेल कॉलेजची खूप आठवण होते.. विशेषतः पावसाळ्यातल्या त्या मस्त कँपसची..पावसाळा आला की तिथे पहिल्या आठवड्यात नुसते डराँव डराँव ...

कुठे जातो तुमचा आयकर ? - ४ शुक्रवार, १३ जानेवारी २०१२, २०:२५ (+०५:३०)

अभिजीत Nirankush

आकाश टॅबलेट विकत घेण्यात

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी वाजत गाजत आकाश टॅबलेटचे उद्घाटन केले. खुल्या बाजारात याची किंमत २५०० रु. असून सरकार सुरुवातीला १,००,०० टॅबलेट्स
विकत घेवून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात १७५० रुपयांना देणार आहे.(अजून पुढे किती टॅबलेट्स घेणार ते ...

विकास हाच प्रमुख मुद्दा असावा. बुधवार, ११ जानेवारी २०१२, १२:४५ (+०५:३०)

Waman Parulekar वामन परुळेकर

विकासाचाच मुद्दा हवा.

गेल्या अनेक निवडणुकात या देशात अनेक प्रयोग झाले. गरीबी हटाव,शीख दंगलीच भांडवल,बोफोर्स,राम मंदीर,इंडीया शायनिंग अशा अनेक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. कधी कांद्याने कोणाला रडवले तर कधी तोफेने. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भावनिक मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. धर्माधर्मात फूट पाडण्याचे प्रयत्न चालु झाले आहेत. हे सर्व ...

गांधीजी आणि जिना : एक पुनर्विलोकन रविवार, २५ डिसेंबर २०११, १९:४२ (+०५:३०)

लेख संग्रह ...

रामचंद्र गुहा, सौजन्य – लोकसत्ता

 

सुमारे १५ वर्षांपूर्वी मुंबईच्या हुतात्मा चौकातील पदपथावर मला हमीद दलवाई यांचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक आढळले. अत्यंत अल्प किमतीत म्हणजे २०-२५ रुपयांना मिळालेल्या या पुस्तकाचे मूल्य मात्र अमूल्य आहे. गेल्या १५ वर्षांत मी या पुस्तकाची किमान सहा-सात पारायणे केली असतील. हमीद दलवाई आज फार थोडय़ा लोकांना माहिती असले ...

तुझ्यासाठी मंगळवार, १३ डिसेंबर २०११, १९:०६ (+०५:३०)

रे घना

ती रुसते रागावते आणि आपण आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून तिला हसवू पहातो. तिच्यासाठी सर्कशीतला विदुषक होतो. गुलाबी गालावर सुकलेले अश्रू पुसत ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते आणि आपण पसरलेल्या बाहूंच्या पंखात विसावते.

कधी कधी आपण रागावतो. आपल्याही नकळत तांडव करतो. ती भेदरते. आपल्या रागाला शरण जाते. आपल्याला हसवू पहाते. उषेचे रंग होते. फुलांचे गंध होते. आपण हरवून जातो त्यात. ...

लोकशाहीचा ‘बूस्टर डोस’ किती प्रभावी? सोमवार, १२ डिसेंबर २०११, २०:०७ (+०५:३०)

लेख संग्रह ...

डॉ. सुहास पळशीकर, राज्यशास्त्राचे प्राध्यापक, पुणे विद्यापीठ

 

गेल्या काही महिन्यांत आपल्या प्रातिनिधिक संसदीय पद्धतीत काही सुधारणा करण्याची चर्चा सुरू झालेली दिसते. भ्रष्टाचार-विरोधी आंदोलनाने ज्या सुधारणा सुचवल्या आहेत, त्या ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ या स्वरूपाच्या आहेत की काय, हे तपासून पाहण्याची गरज आहे.

————————————-

ऑगस्ट महिन्यात भ्रष्टाचार-विरोधी ...

एका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी बुधवार, ३० नोव्हेंबर २०११, १६:०६ (+०५:३०)

नरेंद्र प्रभू (Narendra Prabhu) शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )


तर हा नेता, तिबेट मधून निघाला! वंश,संस्कृती या दृष्टीने तिबेटच्या दक्षिणेस निघून जाणं या नेत्याला स्वाभाविक होतं थायलंड, व्हिएतनाम,कंबोडीया किंवा पूर्वेकडचा कोरिया, जपान या सारखी कितीतरी पितवर्णीय चपट्या नाकांची बौद्धधर्मीय राष्ट्रे याच्या समोर होती पण, यानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अगदी ब्रम्हदेश(म्यानमार), नेपाळ यांचाही ...

कापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़ि... रविवार, २७ नोव्हेंबर २०११, १९:२६ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

कापूसप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीत

शेतकरी संघटनेचा सरकारवर हल्लाबोल

                    कापसाच्या वाढीव हमी भावाच्या मुद्यावरून पेटलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सरकारच्यावतिने मुख्यमंत्री ...

चीन युद्धातील चुका आणि घोडचुका सोमवार, २१ नोव्हेंबर २०११, ११:३१ (+०५:३०)

लेख संग्रह ...

मेजर जनरल(निवृत्त) शशिकांत पित्रे, सौजन्य – सकाळ सप्तरंग

 

भारत आणि चीन यांच्यातील कुरापती सुरू होत्या, त्या चीनच्या बाजूकडूनच. सातत्याने सीमेवर कुरबुरी करून भारताला डिवचण्याचे चीनचे उद्देश सुरूच होते. चीनने आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी आपल्याला हवे तेव्हा युद्ध पुकारले आणि हवे तेव्हा थांबवले. 1962 च्या कटू आठवणींचा व तो सारा इतिहास या वेळी. मागील अंकात भारत-चीन ...

तेलाचा शाप…लिबिया शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, ११:३० (+०५:३०)

लेख संग्रह ...

गिरीश कुबेर, सौजन्य – लोकसत्ता

कोणाच्या तरी मरणाचा कोणाला तरी आनंद व्हावा, हे तसं वाईटच. तसा तो होत असेल तर त्यातून काही गंभीर दोष दिसतो. जो गेला त्याचाही आणि जे त्यानंतर आनंद व्यक्त करतात, त्यांचाही. अल जमाहिरिया अल अरेबिया अल लिबिया अल शाबिया अल इश्तिराकिया अल उझ्मा या देशातला असा दोष दिसून आला. हा देश म्हणजे लिबिया आणि वर लिहिलं ते त्याचं खरं नाव.

कर्नल मुअम्मर ...