रे घना
अलीकडे माणसांच्या चांगुलपणाचे अनुभव अभावानेच येतात. कुणाशीही प्रेमाने वागायचं म्हणलं कि आपला अहंकार, आपला स्वार्थ, आपला मोह, आपला लोभ आडवा येतो. खरंच आपल्या जगण्याचं प्रयोजन काय ? का नाही आपण माणूस म्हणून प्रत्येकावर निख्खळ प्रेम करू शकत ? अवतीभवती सारं जग असं वागताना, एकमेकांना पाण्यात पहात असताना आपली जगण्याची उमेद संपते. वाटत का जगतो आहोत आपण ? कशासाठी लिहितो ब्लॉग ...