गेले बरेच दिवस पाबे-मढे घाटात जायचा विचार मनात घोळत होता, आणि अचानक आजचा योग जुळून आला...
पप्पांचे मित्र बानगुडे काका यांच्या गावाची, रांजण्याची, आज सरपंच पदाची निवडणूक होती, .. अशीही मला सध्या Second Shift आहे आणि पप्पांना पण मोकळा वेळ होता,.... मग काय??... आम्ही दोघं पण निघालो त्यांच्याबरोबर... सध्याच्या पावसाळी दिवसांत इथलं वातावरण, आणि त्यातुन दिसणारी हिरवीगार भाताची खाचरं अफलातूनच... ...