अक्षरधूळ
गणपतीच्या आरतीत एक ओळ आहे. रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा / चंदनाची उटी कुंकुमकेशरा /हिरेजडीत मुगुट शोभतो बरा / रुणझुणती नूपूरे चरणी घागरिया // या ओळीतला फरा हा काय प्रकार आहे? या शब्दाचा अचूक अर्थ काय? असे कुतुहल माझ्या मनात बरेच दिवस होते. प्रसिद्ध मराठी लेखिका विजया राजाध्यक्ष यांनाही या शब्दाबद्दल कुतुहल होते असे नुकतेच माझ्या वाचनात आले. ...