देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मस्त

पुन्हा विरह गुरुवार, ०४ नोव्हेंबर २०१०, १८:३४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कालचा दिवस इतका मस्त! सकाळी येतांना आईने घरून करून आणलेला फराळ आणला. खर तर फराळाला घरी अस तिला म्हणणार होतो. पण हे सांगायची हिम्मत करता करता पुढची दिवाळी यायची. आणि जरी हिम्मत केली असती तर, तिची आणि माझी इतकी कुठे मैत्री आहे? की ती माझ्या म्हणण्यावर येईल. आणि त्यात ती तिच्या घरी देखील गेल्यावर दिवाळी नंतर येणार. त्यामुळे काल मी कंपनीत येतांना फराळ आणला. घरून निघाल्यावर तिला पिंग ...

मस्त बुधवार, २२ सप्टेंबर २०१०, ०२:४५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय सांगू आणि काय नको अस झालं आहे आता. कालचा तो दिवस. दिवस कसला स्वप्नंच. परवाचा दिवस आणि ती रात्र. रात्री असली चित्रविचित्र स्वप्न पडली ना. असो, नीट झोपच आली नाही. काल सकाळी उठलो तरी सर्दी आणि डोकेदुखी कमीच होईना. व्यायाम करतांना खुपंच हाल झाले. शेवटी अर्धवट व्यायाम सोडला. सुट्टी घ्यावी अस मनात येत होते. पण गेलो तसाच. दाढी सुद्धा नाही केली. एकतर आधीच अशक्तपणा, त्यामुळे काळवंडलेला ...

प्रश्न सुटला शनिवार, ०४ सप्टेंबर २०१०, ११:५६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कालची ती दुपार. किती मस्त गेली म्हणून सांगू. काल सकाळी काकू टपकल्या. डायरेक्ट डेस्कवर. काकू आलेल्या पाहून खर तर खूप आनंद झाला. म्हणजे मला वाटलं आता ती नक्की येईल. असो, पण ती आली नाही. काकू खूप वेळ होत्या डेस्कवर पण शेवटपर्यंत ती आली नाही. असो, एक प्रश्न अडला होता ना मला. तो इमेज मधील टेक्स्ट रीड करायचा. तो सुटला. माझ्या दाजींनी मला एक टिफ फोर्मेटची इमेज मेल केली होती. आणि ती इमेज मधील ...

स्वप्न बुधवार, ०१ सप्टेंबर २०१०, १०:१० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज मी स्वप्नात आहे बहुतेक. खरंच स्वप्न की सत्य आहे हेच कळत नाही आहे. काय सकाळ आहे. जाम जबरदस्त. आज सकाळी सकाळी तिने ‘हाय’ केले. काय बोलू यार मी. काहीच सुचत नाही आहे. तीने स्वतःहून ‘हाय’. यार स्वप्नंच तर नाही ना. आणि हे तर काहीच नाही माझ्याशी येऊन गप्पा देखील मारल्या. किती छान आहे ती. सगळ स्वप्नंच वाटत आहे. अस कधी होईल, अशी इच्छा होत होती. सकाळी येतांना तो पडणारा पाऊस, ते थेंब. ते कंपनीच्या ...

पावसाचे थेंब रविवार, २५ जुलै २०१०, १४:५७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

गेल्या दोन तीन दिवसांपासून इतके मस्त वातावरण आहे ना! पावसाचे थेंब असले छान पडत आहेत. आत्ता तर, सूर्य नाही पण सीएफएल चा प्रकाश पडावा तसा प्रकाश पडला आहे. एकदम मस्त! मी आत्ताच भिजून आलो आहे. लोक एवढी पावसाला का घाबरतात कुणास ठाऊक? पाऊस पडत असतांना आकाशात बघायचं, ते कोटी कोटी थेंब पडतांना असले जबरदस्त दिसतात ना! आणि रात्रीच्या वेळी तर विचारूच नका. रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात पहा ...