“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.”
दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्यांदा चहाची आठवण करुन दिली.
कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला ...