देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कंट्रोल

उदास मंगळवार, १४ डिसेंबर २०१०, १६:१४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज खूपच जास्त बोर झाले आहे. म्हणजे तसा मी ‘बोरकर’च आहे. पण आज जरा जास्तच बेकार वाटत आहे. कालचा दिवस आणि आजचा. थोडक्यात दोन टोक. म्हणजे धो धो पावसात चिंब भिजावं. सगळ शरीर रोमांचून निघावं. आणि अचानक कडक तळपत्या उन्हात शरीर भाजून निघावं. काल ती! यार खूप आठवण येते आहे. कस होणार कंपनी सोडल्यावर माझ? मी आलेल्या ऑफर नाकारू का? ‘तिच्याशिवाय’ कस राहू? तिचे येणे, तिचे बोलणे, तिचे पाहणे काय नाही ...

दिवस असा की शुक्रवार, १९ नोव्हेंबर २०१०, २२:५५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय बोलावं अस झालं आहे. आजचा दिवस! सर्वात सुंदर दिवस. मला आता नाही रहावत. मी बोलून मोकळा होतो. मला खरंच, नाही आता कंट्रोल. खूप दिवसांनी सकाळी उठून पळायला गेलो. आवरून पहिल्या इंटरव्यूसाठी गेलो. या कंपन्या सुद्धा असले अर्धवट पत्ते देतात. दोन किमी पायपीट करावी लागली. कंपनी फार काही खास नव्हती. ते नेहमीप्रमाणे बराच वेळ बसून राहावे लागले. त्या कंपनीची एच आर ने दहा जणांमध्ये सुरवात ...

बोरकर मंगळवार, ०५ ऑक्टोबर २०१०, १३:०० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

खरंच खूप आनंद होत आहे. काय सांगू, आज मी तिला इतक बोर केल की, तिने मला शेवटी मी बिझी आहे. अस म्हटलं. खरंच मी खूप बोर करणारा आहे. कोण कामात आहे आहे, कोण मोकळ आहे हे सुद्धा कळत नाही मला. तिच्या प्रोजेक्टमध्ये खूप काम आहे. आणि मी सारखा पिंग करून तिला त्रास देतो. सर्वांनाच मी खूप बोर करतो. फोनवर बहिणाबाईला, घरी आई वडिलांना. आणि कंपनीत तिला. काय बोलावं, तेच कळत नाही आहे.

ब्लॉगवर देखील बोर करतो. ...

बेकार मंगळवार, २८ सप्टेंबर २०१०, १७:५० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज खरच खूप बेकार वाटत आहे. ऑफिसला आज मी उशिरा आलो आहे. खर तर येणार नव्हतो. पण आलो. तिची खूप आठवण येत होती. एक दिवस घरी राहून पहिले. माझा अभ्यास व्यवस्थित होत आहे. परंतु तिची खूप आठवण येत होती. आज दुपारी मनावर खूप कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला. पण नाही झाल कंट्रोल. आज बिन दाढीचा. तिने अजून मला पहिले नाही आहे. खूप बेकार वाटतो आहे. असो, तिला ‘हाय’ केल. पण पुढे ...

आकारमान गुरुवार, ०८ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय सांगू गेल्या वर्षभरात स्वतःकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे माझे वस्तुमान आणि आकारमान खुपंच वाढले. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मित्रांचा ‘माझे आकारमान’ हा आवडता विषय होऊन गेला आहे. माझी मैत्रीण देखील माझी याच विषयावरून खेचायची. आणि खेचता खेचता तीचे देखील ‘आकारमान’ वाढले होते. पण ती पाहिल्या प्रमाणे झाली आहे. मी मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये वजन केले तेव्हा ६४ किलो होते. ...