माझा जन्म रत्नागिरीचा. त्यामुळे ‘हापूस’ या फळाशी माझे तेव्हापासून चे नाते. त्याचे (जन्माचे नव्हे हो, हापूस चे) बरेच वर्ष मला काही कौतुक वाटायचे नाही. चुकीचा समज करुन घेऊ नका. कौतुक नाही म्हणजे – लहानपणापासून ‘हापूस’ हा इतका बघायला (आणि खायला) मिळाला की त्याबद्दल अप्रुप वाटायचे नाही.
अप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून हळूहळू आंब्याचे बाजारात आगमन व्हायचे. सुरुवातीला भाव ...