जीवनतरंग....
आज सकाळीच नाश्त्यासाठी कोबीचे पराठे केले होते. ते बघून अहो म्हणाले, “अरे वा!! कोबीचे पराठे !!!!(आवाजात खूप आश्चर्य व आनंद !!!!). मी मनात म्हणाले,” याला कोबीचे पराठे इतकें कधीपासून आवडायला लागले ?” . मग लक्षात आले हा काल पाहिलेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे?’ या चित्रपटाचा परिणाम….त्यामध्ये नाही का राणी मुखर्जी जिथे शक्य असेल तिथे ह्रितीक रोशन साठी ‘गोभी के पराठे’ त्याला खिलवत असते……मग ...