सवयीने ते कुलूप मी जेंव्हा माझ्या रिकाम्या लॉकरला लावण्यासाठी घेतलं, क्षणात माझ्या लक्षात आलं, आता कसलं कुलूप नी कसली किल्ली! आज मी सर्वकाही मोकळं करुन निघून जात आहे, ही जागा रिकामी करुन जात आहे, नवीन येणार्यासाठी.. तो माझी जागा घेईल, मग तोही एक दिवस ती रिकामी करेल, मग दुसरा कोणीतरी त्याची जागा घेईल. आणि असं करत करत एक दिवस त्या जागेचीही कोणीतरी जागा घेईल. विश्वाच्या ...