देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मुक्त

शोकाचे प्रहर उमलता शनिवार, २४ डिसेंबर २०११, ०३:४२ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

चारी बाजूनी अंगावर येत घुसमटवून टाकणा-या शांततेच्या भिंती आणि इतका श्वास कोन्डूनही कोणाला सांगायची सोय नाही... किंवा कोणाला सांगून काही फायदा नाही असा पार खोल साक्षात्कार. आपण कोणाला सांगतो आणि मग दुसरा संकटमोचन असल्याच्या नादात सहानुभूती, सल्ले, आपले साधर्म्य असलेले अनुभव असे काही ना काही आपल्या दिशेने टाकू लागतो. ऐक ना बाबा, ऐक, फक्त ऐक. जसे हे वाचतोयेस तसे नुसते एक. ...

दम मारो दम..... रविवार, ०८ मे २०११, ११:५६ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

संध्याकाळ होत येते... दिवसभर घातलेला शहाणपणाचा अंगरखा डाचायला लागतो... जगात दोन नाही तीन प्रकारची माणसे असतात....एक आहोत तिथेच बघणारी..एक आहोत त्याच्या थोडं पुढे बघून कुठे पाऊल टाकायचं ते ठरवणारी....आणि तिसरी म्हणजे या पहिल्या दोघांकडे आणि खूप दूर बघणारी आणि कदाचित कुठेच न जाणारी....खूप दूर पाहिलं कि सगळी पावलं सारखीच भरकटलेली वाटतात. थोड्या अंतरात अर्थाची सुसंगती असते. पण ...

प्रिय मी, मंगळवार, ११ जानेवारी २०११, ००:२१ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

प्रिय मी,
तू काय करतोयेस असं प्रश्न पडल्याने आता असे पत्र पाठवण्याची वेळ आली आहे....
तू वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून अस्वस्थ वगैरे होतोस, आणि मग पुस्तकांच्यात वगैरे डोकं
खुपसून वर्तमानपत्रातल्या प्रश्नंची उत्तरे शोधू पाहतोस....
त्या वर्तमानपत्रात असणारा वर्तमान केव्हाच पळवला गेला आहे, आणि तिथे मायावी भविष्यकाळ पुरवला जात आहे
वर्तमान म्हणून.... लख्ख उजळ ...

सूर्यास्त गुरुवार, २५ नोव्हेंबर २०१०, २३:३६ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

समोर उंचच उंच इमारती आहेत, म्हणजे स्कायस्क्रेपरस... आणि ही संध्याकाळ आहे.... काही दिवसांपूर्वी 'जल' नावाच्या चक्रीवादळाच्या कारणाने वातावरण ढगाळ होतं... पण आता ते चक्रीवादळ हे कारण उरलेलं नाही..पण वातावरण ढगाळ असतं....रात्री पाउस पडतो...दिवसभर तो ओलसरपणा उरतो....उन्ह कुठेच नसतं.... आणि मग संध्याकाळ येतं....दिवस होतं एवढं दर्शवण्यापुरता उन्ह स्पर्श करून जातं.... आणि त्या उन्हाच्या उबेचा ...

दिव्या दिव्या दिपत्कार शनिवार, ०६ नोव्हेंबर २०१०, २०:४६ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

या दिवसात दुख वगैरे गोष्टींची आठवणच यायला नको. उदास वाटायला नको, चुकीच्या जागी अडकून पडलो आहोत असं वाटायला नको, जवळपास खूप माणसे असण्याचा कंटाळा यायला नको, अगदी जवळचं माणूसही गाभ्याशी आपल्याशी अनभिज्ञ आहे असा साक्षात्कारही व्हायला नको. होतोय एवढं खरं, असं वाटतंय एवढं खरं...
काल लोकलमधून येत होतो. एक भिकारीण, थकलेली, त्वचेवर सुरुकुत्यांचा जाळे , अनेक वर्षापूर्वी डोळ्यांवर ...

सुभाषितेन गीतेन युवतीनां च लीलया ... बुधवार, २० ऑक्टोबर २०१०, १२:२० (+०५:३०)

आश्लेषा संस्कृतानुभव

सुभाषितेन गीतेन युवतीनां च लीलया |
यस्य न द्रवते चित्तं स वै मुक्तोऽथवा पशुः ||

- सुभाषिते , गाणे आणि सुंदर तरुणींच्या ...

त्या अंधाराचं काय शनिवार, १६ ऑक्टोबर २०१०, २१:३८ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

त्या अंधाराचं काय,
शब्द उधळून झाल्यावर सांगायच्या राहिलेल्या अर्थाचा अंधार....
माणसांच्या असण्याच्या ओझ्याने गुदमरलेल्या शहरात
सापडणारे विरळ एकटे कोपरे.. आणि हळूहळू त्यांच्याही साम्राज्यावर
पडणारा गर्दीचा एकरकमी घाला....
इतके चेहेरे, गोरे, काळे, देखणे, फेन्गाडे, रंगीत, कोरे-करकरीत
अवयवांच्या लयीत सामावलेले इच्छांचे स्वैर संगीत
त्यातल्या कुठल्याही चेहेर्यावर ...

न सापडलेल्या जगण्याचे दंश सोमवार, २७ सप्टेंबर २०१०, १९:११ (+०५:३०)

encounters with reality शब्दवेल

अवेळी जन्मलेल्या बालकासारखा सुरु होणारा
प्रत्येक दिवस, आणि जागं होण्याच्या पहिल्या क्षणावर
उमटलेले डंख, कुस्करलेल्या स्वप्नांचे
मग त्यानंतर निसटत जाणारा दिवस, स्वतःच्या प्रतिमांच्या
लंपट पाठलागात
स्पष्टीकरणे आणि गनिमी कावे यांनी उभारलेली सोयीस्कर तटबंदी

गुरफटून घेणं स्वतःला एखाद्या बिनडोक चादरीत
आणि आढ्याकडे बघून प्रोजेक्ट करत राहणं नकोनकोसा भूतकाळ

यार... रविवार, २६ सप्टेंबर २०१०, १६:१४ (+०५:३०)

encounters with reality शब्दवेल

इथे आलो तेव्हा संध्याकाळ कधीच ढळून गेलेली. मित्रांसोबत गप्पात रंगलो तेव्हासुद्धा एका कोपर्यात कधीही वेडसर होणारा एकटेपण ढुश्या मारत होतं. अर्थात आपलं पैसा जात नव्हता खाण्या-पिण्यात, बस मित्राची बडबड ऐकून घ्यावी लागत होती. आणि तेही बरोबर आहे म्हणा, ते माझी वटवट सहन करतात, मला पार्टी देतात, या सगळ्याचा कृतज्ञ म्हणून ऐकलच पाहिजे. किंवा तिथे आहोत असं भासवून आपल्या भोवती न ...

नको पाठवू असे कितीदा शुक्रवार, २४ सप्टेंबर २०१०, ०२:३८ (+०५:३०)

encounters with reality शब्दवेल

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !