माझ्या डेस्कसमोरील खिडकी नामक ‘टीव्हीतून’ अनेक वाहिन्यांचे दुरून दर्शन घेत असतो. कधीही पहा, एकानंतर एक कार्यक्रम अखंड चालूच असतात. ज्यावेळी मी कामातून उबतो. त्यावेळी त्या टीव्हीवरील ते दूरदर्शन पहाण्याचे सुरु करतो. अनेकदा दुपारच्या वेळी ‘घडलं बिघडलं’ चालू असते. म्हणजे कदाचित कावळ्यांच्या कॉलेजात काहीतरी आधीच घडले असते. आणि त्यावरून चार चौघे, म्हणजे काही कावळे आणि ...
घराच्या खिडकीतून पलिकडे क्षितिजावर डोंगररांगा दिसतात. रोज सूर्य त्या डोंगरांमागे हळूहळू मावळतो. मी खिडकीत उभारलोय आणि मागे सूर्य त्या डोंगरांमागे मावळतोय असा छानसा फोटो काढावा, या विचारात मी होतो. पण वरच्या सळईला प्रत्येक हादर्यामागे डोकं आपटून घेत, ‘टमटम’ मधून घरी पोहचेपर्यंत सूर्य मावळला होता. एव्हाना माझी पाठही अवघडली होती. ही ढोली माणसं टमटम मध्ये कशाला बसतात!? असू देत! ...
माझ्या कंपनी जवळपास सर्वच बुजगावणे काम करतात. ते शेतात आपण पाखरांना येऊ नये म्हणून चारा आणि लाकडांचा वापर करून एक ‘बुजगावणे’ बनवतो. त्याला कपडे घालतो. आणि उभे करतो. तसे, अगदी तसे आमच्या कंपनीत हे बुजगावणे आहेत. बसमध्ये बसले तर मानेचा साधा ४५ अंशाचा देखील करीत नाहीत. शेजारी कोण येऊन बसला. कोण गेला. यांना काहीच फरक पडत नाही. कधी चुकूनही स्वतःहून बोलणार नाहीत. एक तर नाकासमोर बघणार ...