आत्ता माझी तब्येत तशी फारशी काही ठिक वाटत नाहीये. थकवा आला आहे, थोडंसं डोकं दुखत आहे. तसं मी त्यासाठी गोळी घेतली आहे. थकव्याचं माहित नाही, पण डोकेदुखी तरी कमी होईलच. इथं मी इतके दिवस फिरकलो नाही, याचं कारण आळस, कंटाळा हे नसून त्यासाठी लागणारा मोकळा वेळ आणि साधनं माझ्याजवळ नव्हती. इंजिनिअरिंग तर आता संपलेलंच आहे. त्याचबरोबर अनेक अनुत्तरीत प्रश्नांना अर्धविराम मिळाला आहे. ...