देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आचरट

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ५ रविवार, ०१ मे २०११, १०:५९ (+०५:३०)

हेरंब वटवट सत्यवान !!

माझ्या खादाडीच्या प्रयोगांचे पहिले चार भाग वाचल्यानंतर मला अनेक लोकांच्या तक्रार वजा प्रतिक्रियांना (ज्यात प्रतिक्रिया वजा आणि तक्रारीच अधिक होत्या) तोंड द्यावं लागलं. उदा. पहिला  भाग वाचल्यावर ...

उगाच काहीही -१ सोमवार, ०७ मार्च २०११, ०३:३० (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

गेले काही दिवस फारच दणकट, भरभक्कम वगैरे लिहितोय असा काहीतरी माझा स्वतःचाच गैरसमज झाला. त्यामुळे वैचारिक थकवा आल्याचा एक आभास निर्माण झाला. त्यामुळे एरव्हीही वेळेवर चालण्यास नकार देणारी आळशी बुद्धी आज सरळ डोक्यावर चादर ओढून झोपून राहिली. कारणमीमांसा करण्यासाठी खोलात जाऊन विचार करायचा प्रयत्न केला तर हिवाळा असूनपण एकदम खूप उकडायला लागलं. मग लक्षात आलं की फार खोलात जाता जाता ...

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ४ शनिवार, ०२ ऑक्टोबर २०१०, १०:४० (+०५:३०)

हेरंब वटवट सत्यवान !!

'माझे खादाडीचे प्रयोग : भाग १' इथे वाचा
'माझे खादाडीचे प्रयोग : भाग २' इथे वाचा
'माझे खादाडीचे प्रयोग : भाग ३' इथे वाचा

हल्ली हा माणूस ब्लॉगची जाहिरात करण्यासाठी स्वतःच्याच जुन्या पोस्ट्सचे दुवे देत ...

कंपोस्ट शुक्रवार, ०१ ऑक्टोबर २०१०, १२:१७ (+०५:३०)

हेरंब वटवट सत्यवान !!

कधीकधी उगाच लांबलचक, मोठमोठ्या पोस्ट्समुळे फार 'कं' यायला लागतो ....... वाचणार्‍याला...... अर्थात लिहिणारा माझ्यासारखा असेल तर मग हमखासच. अर्थात माझा मलाही कं येतोच.. पण तरीही कधी कधी सगळं तपशीलवार ...

णिषेढोपणिषड बुधवार, २९ सप्टेंबर २०१०, १०:१३ (+०५:३०)

हेरंब वटवट सत्यवान !!

नमो नमः सुजनहो, सृजनहो व भक्तजनहो. 'आदिलीलापुराणा'च्या आजच्या श्रवणोपासनेत आपले स्वागत. विविध आदिलीलांनी ओतप्रोत भरलेल्या 'आदिलीलापुराणा'चे अमृत आपल्या कानांत साठवून घेण्यासाठी उत्सुक ...

...... !!! मंगळवार, २४ ऑगस्ट २०१०, ०५:३९ (+०५:३०)

हेरंब वटवट सत्यवान !!

ज्जे ब्बात.. असं कन्फ्युजिंग शीर्षक टाकण्याचा एक फायदा असतो तो म्हणजे सदरहू लेख किती विस्कळीत आहे याचा थोडाफार तरी अंदाज येऊन वाचक नाईलाजाने का होईना जरा सावरून बसून वाचायला लागतात. आता आपल्यात ...

एपिसोड गुरुवार, २९ जुलै २०१०, १३:३७ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

काही संवाद, घटना अन् पात्र

मित्र – असं धार सोडून चालणार नाही…

नायक –  अं??????

मित्र - सगळं काही नीट होईल…

नायक – थोडा ओशाळून… पण… तुला कसं कळलं ??

मित्र – अरे, अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात? अत्ताच शेजारची सुमी भेटली, तिनंच सांगितलं…

नायक- काय????? सुमीलाही कळलं?

मित्र – अरे, शेजारी बेपत्ता झाल्याचं काल लपून राहतं?

नायक – अं??

मित्र – अरे, काकांना शोधायला आम्ही तुझ्या ...

कंटाळा पुराण - तृतीयोध्याय शुक्रवार, २८ मे २०१०, ०४:५१ (+०५:३०)

हेरंब वटवट सत्यवान !!

काही कारणांनी वाचनालयात जाऊन जुन्या पोथ्या, पुराणं चाळण्याचा योग नुकताच आला. चाळता चाळता अचानक या जिव्हाळ्याच्या विषयावरचं पुराण नजरेस पडलं. पुराणाचं नाव होतं "कंटाळा पुराण" !!! आपल्या एवढ्या आवडीच्या विषयावर एखादं पुस्तक आणि तेही चक्क पुराण असेल याची तोवर कल्पनाही नव्हती. थोडक्यात "पुराणकाळीही लोक कंटाळत असत तर".. !! या कल्पनेने जेवढं हायसं वाटलं तेवढाच आनंदही झाला. हे पुराण ...

(((((...))))) शनिवार, ०८ मे २०१०, ०६:३५ (+०५:३०)

हेरंब वटवट सत्यवान !!

१. हल्ली (तसं म्हटलं तर ब्लॉग सुरु केल्यापासून असं नाही, आधीपासूनच) मला (इतरांबद्दल बोलण्याचं आपल्याला काय प्रयोजन?) असं (तसं, वगैरे वगैरे) जाणवायला (आम्हालाही जाणवतात गोष्टी. जाणीवा जागृत आहेत आमच्याही) लागलं (जास्त जोरात नाही पण अगदी हळूही नाही) आहे (?.. खरं तर नाही. पण लोकांनी नाही नाही ते बोलून भाग पाडलं आम्हाला विचार करायला) की (!) मी (खरं तर आम्ही लिहायला पाहिजे ...

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ३ गुरुवार, १५ एप्रिल २०१०, ०२:५३ (+०५:३०)

हेरंब वटवट सत्यवान !!

"आज आपण बघणार आहोत पास्तुला कसा करायचा" झगावाल्या बाई हात जोडून सुहास्य वदनाने वदत्या झाल्या.

पोस्टची सुरुवातच ढळढळीत खोट्या वाक्याने करू शकत नसल्याने आधीच कन्फेशन देऊन टाकतो की असं काहीसं त्या झगावाल्या बाई न कळणार्‍या विंग्रजीत (की स्पॅनिशात ?) म्हणाल्या असाव्यात असा तर्क मांडून मी या वरच्या वाक्याने सुरुवात करून पुढची प्रक्रिया बायकोला सांगायला सज्ज झालो. काही नीट ...