चिंगी : मंग्या, कालपासून बघत आहे कि क्त या विषयावर खूप पुस्तक वाचत आहेस . काही विशेष कारण ? . . . मंग्या : चिंगे, डॉक्टर ने मला उद्या ब्लड ...
चिंगी : मंग्या, कालपासून बघत आहे कि क्त या विषयावर खूप पुस्तक वाचत आहेस . काही विशेष कारण ? . . . मंग्या : चिंगे, डॉक्टर ने मला उद्या ब्लड ...
आज सकाळी मला एक स्वप्न पडलं. त्यात कॉलेजने सगळ्या इव्हेंटचं अगदी बारिक-सारिक सविस्तर रेकॉर्डिंग केलं होतं. या रेकॉर्डिंगचं वैशिष्ट्य असं होतं की, मी आणि कोणीही त्यात शिरुन पुन्हा ते इव्हेंटचे दिवस आहेत तसे जगू शकणार होतो. जाग आली! स्वप्न संपलं! हे स्वप्न होतं हे समजल्यानंतर मनाला थोडीशी हुरहुर वाटली. सुंदर स्वप्नातून जाग आली की, बेकार वाटू लागतं.. आणि रात्री भुताच्या ...
तो ऑफिसात पाऊल टाकतो. आपल्या उरल्या सुरल्या केसांची ठेवण ठीक करीत, ‘ए’कारांत शब्दांची उधळण सुरु करतो. डेस्कवर बसताच त्याला झालेल्या कामाची यादी हवी असते. पाणी प्यायचे असते, पण उठून घेण्याची ‘इच्छा’ नसते. आणि मग त्याचे ते डोळेरूपी घुबडांची भीरभीर सुरु होते. आणि त्या घुबडांना एखादे सावज दिसले. की तोंडाची लढाई सुरु. मग समोर कोणीही असो. ह्याला पाणी आणून देण्यासाठी आर्जव. का तर ...
कस बोलू? काय सांगू? मला खरंच तो विषय उफाळून आलेला आहे. अस का होत आहे? तो विषय मी ‘कोळसा’ करायचं ठरवलं. मी माझ्या कोणत्याही गोष्टीसाठी सारवासारव करीत नाही. मला तो विषय संपवून टाकायचा आहे. ‘ती जागा’ मला रिकामी हवी आहे. माझ्या भावी जोडीदाराचा त्यावर हक्क आहे. पण तो विषय आहे की अजूनही विस्तवाप्रमाणे धगधगतो आहे. हवेची झुळूक येते. आणि विस्तव पुन्हा पेटतो. ती अग भडकावतो. मला खरंच नाही सुचत ...
मी खरच खूप कंटाळलो आहे, या लग्न विषयाला. आजकाल जो पहाल तो, हाच एक विषय चघळत असतो. माझ्या नातेवाईकात आणि घरी जणू हा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्या प्रमाणे चर्चा. बर कितीदा अस खोटे खोटे आनंदी आहे दाखवायचे?. मागील आठवड्यात वडिलांना बाईक कधी आणू यासाठी फोन केला, तर त्यांचेही तेच. बाईक आणली. पूजा करतांना तो कार्टून माझा मित्र, काय ते ‘त्वरीतात त्वरितं विवाहे संपन्न..’ अस काहीस म्हणत ...
वर्तमानपत्रातील ‘ए राजा’ची बातमी वाचून ह्या सरकारची किळस येते. डोके फिरते. रात्रीचे अकरा वाजलेले असतात. मी संगणक सुरु करतो. मी नोंद लिहायला बसतो. नोंदीचा विषय ‘ए राजा’. शंभर एक शब्द होत नाही तोच तिची आठवण येते. मी तीचा ‘फोटो’ न्याहाळत बसतो. तिचे पाणीदार डोळे. अस वाटते, ते काहीतरी बोलत आहेत. अर्धा तास निघून जातो. तिची खूप आठवण वाढते. मन त्या मृगजळामागे धावते. अनेक प्रश्न निर्माण ...
झालं एकदाचं. आज मी तिच्याशी तीच्या त्या नव्या डेस्कवर जाऊन बोललो. सकाळी कंपनीत आल्यावर तीचा मेल पहिला. किती छान. आणि त्यात ‘टू’ मध्ये सुरवातीला मी. अगदी मस्त वाटायला लागले. मग हिम्मत करून तीच्या डेस्ककडे निघालो. पण कालप्रमाणे, तीच्या डेस्कजवळ जातांना पुनः हिम्मत गेली. मग तिथून त्या एपीएमच्या डेस्कवर गेलो. मुळात काहीच कारण नव्हते. पण तरीही विषय काढला. तिथून निघालो त्यावेळी काहीच ...
यार, या आयुष्यात किती काळ अशी उत्कंठा राहणार? नुसतेच रोज विचार करायचा ‘ती’चा. देव सुद्धा ना! अस आपल्याला कळायला हव होते. रोज एखादी छान मुलगी दिसली की वाटते ‘ही आपली झाली तर!’. स्थळाच्या वेळी देखील असेच. पण शेवटी सगळे फूस. कंपनीत ज्या आवडतात त्यांना एकतर कोणी ना कोणी असते. किंवा हजार मित्र असतात. मग लढाईच्या आधीच पराभव. बर त्या हजारांच्या डोक्यात काय चालले आहे हे त्यांच्या तोंडवरूनच ...