मुक्ताफळे
काल अॅपल स्टोअरमधे जाऊन आयपॅड पाहून आलो. चांगला अर्धा पाऊण तास हाताळून पाहिला. अॅपलच्या इतर वस्तूंप्रमाणेच ही वस्तू चांगली आहे. आयपॅड नेटवर वाचलं तेव्हा थोडं नाऊमेद झाल्यासारखं वाटलं होतं खरं पण प्रत्यक्ष वस्तू पाहिल्यावर थोडं बरं वाटलं. या आयपॅडबद्दल मला जाणवलेल्या काही बऱ्यावाईट गोष्टी :
वाईट :
- मल्टिटास्किंगचा अभाव : यावर एका वेळी एकच अॅप्लिकेशन चालतं. आयपॅड ...