काल मी गावाला गेलो होतो, आणि आज परत आलो. जग खूपच छोटं आहे, याप्रमाणे जवळपास सर्व मित्रांची अनपेक्षीत भेट झाली. अनपेक्षीत अशासाठी की, तेही दुसर्या गावाला असतात आणि मला माहित नव्हतं की, ते आजच येणार आहेत. जाताना बसमध्ये मला लिहिण्यासाठी खूप विषय सूचत होते. तसे ते प्रवासात असताना नेहमीच सूचत रहातात. प्रवासात असताना मन आपोआप जीवनाचा आढावा घेऊ लागतं. पण सध्या आत्ता या ओळी ...