देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शांतरस

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची शनिवार, ३१ डिसेंबर २०११, ०३:०३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन
माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||

या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला
पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला
बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर
अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन

दत्त दत्त बोलत गेलो बुधवार, २८ डिसेंबर २०११, ०४:४३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

दत्त दत्त बोलत गेलो

दत्त दत्त बोलत गेलो
गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो
दत्ताला भजूनी धन्य झालो
झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो ||

दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी
जगामधे मीच आहे सर्व सुखी
नकळे मला मी कोण होतो
दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो ||

प्रवास बुधवार, २१ सप्टेंबर २०११, ०५:२२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

प्रवास
दुर पुढे जातांना सरलेली मागची
वाट नजरेच्या आवाक्यात येते.
किती चालायचे अजून बाकी
याची आठवण होते.

पायात रूतलेले काटे, दगड
लागणारा पाऊस वारा उन
प्रवासातला होणारा त्रास
निब्बर करतं त्वचा अन मन

तसल्या ...

आरती गुरूदत्ताची शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०३:५२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

मंडळी, शब्दगारवा २०१० मध्ये गुरूदत्ताची आरती गेल्या दत्तजयंतीला प्रकाशीत झालीय. ती येथे देतोय. शब्दगारवा २०१० त आणखीही लेख अन कविता आहेत. त्या आपण नजरेखालून घालाव्यात. (कवितेत सार्थ बदल प्रमोद देव काकांनी केले आहेत. त्यांना धन्यवाद.)

आरती गुरूदत्ताची

आर्त विनवणी करू गुरूदत्ताची
ब्रम्हा विष्णू महेशाची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||ध्रू||

ब्रह्मदेव सृष्टी ...

हळूच द्या मज झोका कान्हा शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०३:२६ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

हळूच द्या मज झोका कान्हा
हळूच द्या मज झोका कान्हा
चित्त नाही माझे थारा
हळूच द्या मज झोका कान्हा ||धृ||

मन विचलीत झाले वासनांनी भरले
घुसळोनी लोणी काढूनी घेती

आम्ही काय म्हणूं धार्मीक शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०३:२२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

आम्ही काय म्हणूं धार्मीक |
आम्ही जगाचे नास्तिक ||१||

आम्ही जप नाही केले कधी |
रामनाम नाही आमच्या ओठी ||२||

नाही कधी घडला संतसंग |
पाण्यावीण दुष्काळी मेघ ||३||

देवाचीये न लागू चरणा |
धुळीच्याच पडलो प्रेमा ||४||

नाही कधी गेलो पंढरीसी |
कधी नाही बोललो सावळ्याशी ||५||

कधी नाही लिन ...

आपण सारे शिर्डीला जावूया शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०१:५१ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

आपण सारे शिर्डीला जावूया

या संसारातूनी....या या संसारातूनी
थोडा वेळ काढूया....हो हो थोडातरी वेळ काढूया...
चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया
शिर्डीला जावूया ||धृ||

शिर्डीला लागले साईबाबांचे पाय हो....
साईनाथांचे पाय हो
शिर्डीवाचूनी मग दुसरा स्वर्ग असेल काय हो?
एकदातरी...
एकदातरी आपण तो स्वर्ग पाहूया
चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया
शिर्डीला जावूया ||१||

निम्मा रस्ता चालला शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०१:४० (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

निम्मा रस्ता चालला
पार्‍श्वभुमी:हिरो मोठ्या संकटात आहे. तो मनाला प्रश्न विचारतो. कोरस म्हणजे त्याचे +ve मनच आहे.
(एक दुसराही विचार असा करता येईल:-
रस्ता=जिवन, चालणे=जिवन जगणे, थांबणे= मृत्यू )

कोरसः
निम्मा रस्ता चालला
मागं वळतो कशाला?
म्होरं जायाचं जायाचं
आता थांबतो कशाला? ||धृ||
.
.
.
.
हिरो:
वाट अवघड, मधी दगड
बाजू करू कसा? ...

माऊलीच माझ्या शेतात भजन गाई मंगळवार, २६ एप्रिल २०११, ०५:५२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

माऊलीच माझ्या शेतात भजन गाई

पीक वार्‍यावर हालेडूले, मागेपुढे होई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||धृ||

शाळू, बाजरी, मका अन गहू
विठ्ठलाचे रूप किती मी पाहू
सारं शेतं माझं पांडूरंग होई
माऊलीच माझ्या शेतात भजन गाई ||१||

विहीरीचे पाणी होई चंद्रभागा
सावळा विठू दिसे निळ्या आसमंता
कशाला मग मी पंढरीसी जाई
माऊलीच माझ्या ...

गण: आमच्या गणाला गणपती आले शनिवार, ०९ एप्रिल २०११, ०३:०४ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

गण: आमच्या गणाला गणपती आले
आमच्या गणाला गणपती आले
वंदन करूनी मस्तक झुकले ||धृ||

रिद्धीसिद्धीचा स्वामी तू गणपती
शरण आलो आम्ही अल्पमती
कार्यारंभी दावूनी उपस्थीती
दयाबुद्धीने आम्हा पाहीले
आमच्या गणाला गणपती आले ||१||

कलाकारां होवोनी ...