एकदा मंग्या वर परमेश्वर खुश झाला आणि त्याला दोन वरदान मागायला सांगितले . मंग्याने वरदान म्हणून ” बेस्ट ड्रिंक ” आणि ” बेस्ट ...
एकदा मंग्या वर परमेश्वर खुश झाला आणि त्याला दोन वरदान मागायला सांगितले . मंग्याने वरदान म्हणून ” बेस्ट ड्रिंक ” आणि ” बेस्ट ...
माझा ना आज काम करायचा बिलकुल मूड नाही. काय मस्त विकेंड गेला आहे म्हणून सांगू! असो, फार पिळत नाही. माझ्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. वीस मे. गेल्या शनिवारी ‘बोलणी’चा कार्यक्रम होता. माझे आई वडील, मावशी, काका आणि आमचे बंधुराज हजर होते. ती, तिचे काका, मामा, आई वडील जवळपास सर्व नातेवाईक आलेले तिचे. मस्त एकदम. सुरवातीला साखरपुड्याची तारीख ठरलेली. म्हणजे १४ मे ला साखरपुडा आणि काहीतरी २ ...
चित्रपटाची सुरवात एका गोड कार्यक्रमाने होते. नायक घरी पोहचतो. नायकाला नायकाच्या वडिलांनी मुलीचे वडील येणार हे सांगण्यात आलेले असते. घरी पोहोचताच, तो मुलीच्या वडिलांसोबत आलेल्या मुलीला आणि इतर नातेवाईकांना पाहून तो चकित होतो. आयुष्यातील त्याचा ‘पाहण्याचा’ पहिला कार्यक्रम असतो.
तो थोडा घाबरलेला, थोडा टेन्शन आणि खूप आनंदात असतो. तो मुलीला आणि ती मुलगी देखील त्याला ...
हा विकेंड जाम मस्त गेला. काय सांगू आणि काय नको अस होत आहे. गेल्या एक महिन्यापासून मी स्वतःला एकटा राहूच देत नाही. एकटा असलो की! नको नको ते विचार मनात यायला लागतात. असो, शुक्रवारी संध्याकाळी माझ्या मुंबईच्या बहिणीचा फोन आलेला की, ती शनिवारी पुण्यात येणार म्हणून. तो येरवड्या जवळचा ‘ईशान्य’ मॉल आहे ना. तिथे तिचा कार्यक्रम होता गाण्याचा. दुपारी गेलेलो. तिच्याबद्दल काय बोलू? माझी ...
चित्रपटाला सुरवात होते. संध्याकाळचा सीन. मुलाच्या घरी त्याच्या आई वडिलांची घाई गडबड चालू असते. मुलगा मात्र स्थिर. मग वडिलांना मुलगा मी टी-शर्ट आणि जीन्स घातली तर चालेल का अस विचारतो. वडील आनंदात ‘हो’ म्हणतात. तेवढ्यात मुलाच्या वडिलांचा फोन वाजतो. वडील फोन उचलतात. मुलगा पडका चेहरा करून कपडे घालणार, तेवढ्यात आई ‘तो लाल रंगाचा शर्ट आणि ती पांढर्या रंगाची पॅंट घाल’. मग काय, मुलगा ...
मुंगी मुंबईहून पुण्याला आली. पुण्यातील हायफाय ठिकाणी असलेल्या एका कंपनीत तिने आपले काम सुरु केले. मुंगी रोज प्रामाणिकपणे कामावर यायची आणि आपल काम करत राहायची. त्या कंपनीचा मालक एक सिंह होता. सिंहाला असे वाटले की आपले काम वेगाने व्हावे यासाठी आणखीन एकाला कामावर ठेवावे. मुंगी करते त्याच कामातील थोड काम दुसऱ्या कोणी केल तर काम आणखीन लवकर होईल या उद्येशाने त्याने एका झुरळाला ...