देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मौजमजा

युगलगीत: बासूंदी गोड गोड शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, ०४:५८ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

युगलगीत: बासूंदी गोड गोड

तो:
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड
तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ||

ती:
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल
तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ||

तो:
दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग
बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग
गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं
तू माझी बासूंदी बासूंदी ...

दगडाची गोष्ट शनिवार, ०१ ऑक्टोबर २०११, ०४:२० (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

दगडाची गोष्ट
(सदरची कविता शिक्षकांनी अंगविक्षेपासहीत विद्यार्थ्यांच्या पुढे सादर केली तर परिणामकारक होते.)

प्रास्ताविक:
निट बसा सगळे लक्ष द्या इकडे
एक गोष्ट सांगतो लक्ष द्या तिकडे

आरंभ:
एक खेडेगाव असते
तिथे एक नदी वाहते

विषयविवेचन:
त्या नदीत असतो एक दगड
मोठ्या दगडांसारखाच छोटा दगड
इतर दगड खुष असत
हा मात्र असतो सतत ...

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा शनिवार, ०१ ऑक्टोबर २०११, ०४:१२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज)
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक
माझा दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
लाकूड तासून, रंधा मारून काढतो भुस्सा ||धृ||

कामं त्याचं हाय सुताराचं
आणतो लाकूडं सागाचं
करवतीनं कापत बसतो
रातीबी तसंच करतो
काय करावं समजना झालं
कामासाठी नुसता झालाय वेडापीसा
लाकूड तासतोय रंधा ...

चुकीचे मोबाईल रिचार्ज बुधवार, २१ सप्टेंबर २०११, ०५:४९ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

चुकीचे मोबाईल रिचार्ज
गट्टू अन गिट्टी जात होते एकाच कॉलेजात
तेथेच जुळले त्यांचे; गुंतले दोघे एकमेकात

गट्टू स्वभावाने वांड होता गावात सोडलेला सांड होता
याच्याशी भांड त्याच्याशी भांड असले उद्योग करत होता

गिट्टीला तो खुपच सोज्वळ भासे
कच्च्या लिंबाप्रमाणे कोवळा वाटे

कॉपी केल्याने कॉलेजमधून रस्टीकेट झाला
अपेक्षेप्रमाणे गट्टू एस.वाय.ला फेल ...

माझी म्हैस बुधवार, २१ सप्टेंबर २०११, ०५:४३ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

माझी म्हैस
एका डोळ्यानं आहे जरी थोडी तिरळी
माझी म्हैस गुणाची आहे काळी काळी ||धृ||

कात्रिना नाव तिचे फार शोभून दिसते
हाय बेबे! म्हटलं तर शेपूट हलवते
मला डाऊट हाय ती पार्लरला न्या म्हणते
जसं नटून सजून होईल ती गोरी गोरी ||१||

शिंगे तिची वाकडी घाटदार छान
दुरून बघीतले तर बदामाचे सिम्बॉल
प्रत्येक रेड्याला ...

माझी म्हैस सोमवार, १२ सप्टेंबर २०११, ०३:३४ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

माझी म्हैस
एका डोळ्यानं आहे जरी थोडी तिरळी
माझी म्हैस गुणाची आहे काळी काळी ||धृ||

कात्रिना नाव तिचे फार शोभून दिसते
हाय बेबे! म्हटलं तर शेपूट हलवते
मला डाऊट हाय ती पार्लरला न्या म्हणते
जसं नटून सजून होईल ती गोरी गोरी ||१||

शिंगे तिची वाकडी घाटदार छान
दुरून बघीतले तर बदामाचे सिम्बॉल
प्रत्येक रेड्याला ...

काय गुण सांगू माझ्या सालीचे सोमवार, ०५ सप्टेंबर २०११, ०४:०१ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

काय गुण सांगू माझ्या सालीचे
माझ्या सालीचे काय गुण सांगू माझ्या सालीचे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||धृ||

ती घरात येते तर एकदम जसे चक्रीवादळ येते
भाऊजी भाऊजी म्हणत ती माझ्या मागे फिरत असते
नटते थटते लाजत मुरडते
मी जरा बोललो तर लाजून आखडते

भरल्या घरात शोभतात का तिला हे असले धंदे?
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ...

मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे र... सोमवार, ०५ सप्टेंबर २०११, ०३:४९ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली.

आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर ...

श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायण... सोमवार, ०५ सप्टेंबर २०११, ०३:४४ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी

आटपाट संकेतस्थळ होतं. आंतरजालावरती त्याचं नाव होतं. तेथे येणारा प्रत्येक सदस्य त्याचप्रमाणे सहज म्हणून येणारा पाहूणा तेथे देहभान विसरत होता. तेथील सुविधांना भुलत होता. देशोदेशातील व्यक्तींना तेथे मुक्त प्रवेश होता. म्हणूनच तेथे अनेक व्यक्तीस्वभावांचे प्रदर्शन भरले होते. असल्याच अनेक व्यक्तींपैकी राजा रवी हा ...

मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? सोमवार, ०५ सप्टेंबर २०११, ०३:२२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
खाता नही पिता नही
बंद पडलीय त्याची वाचा ||धृ||

अब मै क्या करू उसको?
नही डाक्टर दिखानेको
तेरे आंगनमे वो जाताय
कुकुचकु कुकुचकु वो वरडताय
मेरा दानापानी नही उसको भाता
अरे मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||१||

देख हळुहळु तो कसा भागताय
लई उदास उदास दिखताय
चोच उघडी रखके तो बसतोय