देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भारत

विश्वासघात- 1 शुक्रवार, ३० जुलै २०१०, १३:२४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या आयुष्यात आलेला सर्वात अपमानास्पद व लाजिरवाणा प्रसंग कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर निर्विवादपणे मी 1962 च्या युद्धात चीनने भारताचा केलेला सपशेल व दारूण पराभव हेच उत्तर देईन. माझी खात्री आहे की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे असे सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा हेच उत्तर देतील. एखाद्या फुग्याला टाचणी लावावी तसे काहीसे चीनने आम्हा ...

कुठे गेला कुंबळे?? बुधवार, २८ जुलै २०१०, २३:३० (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रि...

च्या आयला श्रीलंकेच्या ६४२/४ दोन दिवसात.. तीन बॅट्समनची सेंच्युरी आणि त्यात संघाकाराची डबल सेंच्युरी, आपले बॉलर काय करत होते, काय तो इशांत, मिथुन आणि काय तो ओझा.. हाइट तर हरभजन!! याला तर साक्षात मुरलीधरनने आपला वारसदार नेमला आहे आणि हा भाऊ ४२ ओवर्समध्ये फक्त एकच विकेट घेतो, कुठे गेला तो पुर्वीचा हरभजन उर्फ टर्बोनेटर? आता याला फक्त IPL खेळायला सांगा तिकडे तर ह्या भाऊने ...

राजनीती शनिवार, २४ जुलै २०१०, १६:१६ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

मी सहसा दिल्लीतल्या राजकारणाबद्दल कधीच लिहित नाही. एकतर मला त्यातले फारसे काही समजतही नाही आणि सत्ताप्राप्ती व ती टिकवणे यासाठी तिथे चालू असलेल्या सततच्या कोलांट्या उड्यांत मला फारसे स्वारस्य वाटत नाही हे ही तितकेच खरे आहे. मात्र गेल्या पंधरवड्यातील एक घटनाक्रम. त्याचा सरळ संबंध भारताच्या परराष्ट्रनीतीशी जोडला गेलेला असल्याने, मला फारच रोचक वाटला व त्यासंबंधाने ...

पुणे आणि पाणी कपात मंगळवार, २० जुलै २०१०, १७:५४ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

अलीकडे जवळ जवळ प्रत्येक वर्षी, जून किंवा जुलै महिन्यांत, पुण्याच्या पाणी पुरवठ्यामधे कपात होणार अशी बातमी कधीतरी हमखास प्रसृत केली जाते. पुण्यातले लोक कसे जास्त पाणी वापरतात, पाण्याची कशी नासाडी करतात वगैरे विषय मग मोठ्या चवीने चर्चिले जातात. मग एकदम अचानक पाऊस बरसू लागतो. तो इतका बरसतो की अगदी नकोसा होऊ लागतो. हा असा पाऊस, आठ दहा दिवस जरी बरसला तरी पुण्याला पाणी पुरवठा करणारी ...

गुगल अर्थ वरची झाकलेली माणके -4 रविवार, १८ जुलै २०१०, १५:२९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

भारतामधले जम्मू आणि कश्मिर हे राज्य, ते भारतात सामील झाल्यापासूनच, सतत वादाच्या भोवर्‍यात सापडलेले आहे. पूर्वेकडे चीन, उत्तरेकडे अफगाणिस्तान, पश्चिमेला पाकिस्तान अशा आंतर्राष्ट्रीय सीमा असणारे हे राज्य, भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या आधीच, नवनिर्माण पाकिस्ताच्या सेनेने टोळीवाल्यांच्या नावाखाली केलेल्या आक्रमणाला बळी पडले होते. या नंतर हे राज्य, भारतीय संघराज्यात ...

कानाखाली एक शुक्रवार, १६ जुलै २०१०, १४:३५ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

माझ्या अमेरिकेमधल्या वास्तव्यात, विचार करायला लावणार्‍या एका प्रसंगाबद्दल माहिती एका मित्राने मला सांगितली होती. हा प्रसंग घडला होता भारतातून अमेरिकेत गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या आयुष्यात. हे गृहस्थ व त्यांच्या पत्नी आपल्या मुलगा व नातवंडे यांच्याबरोबर काही महिने मजेने घालवावे या हेतूने अमेरिकेला गेले होते.या गृहस्थांची नातवंडे होती अर्धवट वयाची म्हणजे धड लहान ...

एक दिवस नियमांचा गुरुवार, १५ जुलै २०१०, २३:०३ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

जर सकाळी उठल्या उठल्या "आजचा हा दिवस तुम्हा सर्वांना मी (देव) व सरकारने बनविलेले सर्व नियम पाळायला लागतील" अशी एखादी आकाशवाणी झाली तर काय गंमत येईल ना. माझा हा दिवस कसा असेल याचे एक चित्र तयार करायचा असा प्रयत्न केला.

मी सकाळीच लवकर उठून अगदी भल्या पहाटे अभ्यंग स्नान वगैरे करुन देवाची पुजा, काकड आरती केली नंतर सर्व मोठ्यांचे आशिर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात केली. बायको ...

गोत्र आणि विवाह संबंध मंगळवार, १३ जुलै २०१०, १६:२९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

नसते वाद विवाद उकरून काढण्यात भारतातील मंडळी जशी वाकबगार आहेत तशी बहुदा दुसर्‍या कोणत्याही देशातील नसतील. खाप पंचायत ह्या उत्तर भारतातल्या एका जुन्या समाज व्यवस्थेने आता सगोत्र विवाहाचा वाद असाच उपस्थित केला आहे. ही खाप पंचायत तशी अनेक वर्षे अस्तित्वात आहे आणि किरकोळ तंटे मिटवण्यासाठी उपयुक्त असल्याने ब्रिटिश व नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने तशीच चालू ठेवली ...

१३ जुलै २००२ मंगळवार, १३ जुलै २०१०, ०९:५८ (+०५:३०)

Gaurav भटकंती.....क्रि...

हल्ली तारखेने फ़क्त काही serious गोष्टीच ओळखल्या जातात जस २६/११, ९/११, ११/७, २६/७ वगैरे वगैरे पण १३ जुलैला पण काहीतरी घडले होते आणि कुठल्याही क्रिकेटप्रेमीसाठी ते ऎतिहासिकच होते, मी २००२ च्या नॅटवेस्ट फ़ायनल बद्दल बोलतोय. मी बारावीत होतो, आणि आमचे दुपारचे कॉलेज होते (१२ ते ५ काय बोर टाईमिंग होते), तर एक मित्र तीनच्या सुमारास म्हणाला चल बे मी चाललो घरी, मी म्हंटल काय झाल, तो म्हणाला अरे ...

क्विक मार्च टू आफ्रिका रविवार, ११ जुलै २०१०, १५:१९ (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

काही दिवसांपूर्वी, भारतातल्याच, ‘भारती एंटरप्रायझेस‘ या कंपनीचे 52 वर्षाचे संचालक व एक बडे उद्योजक श्री सुनील मिट्टल यांनी कुवेत या देशात स्थित असलेल्या ‘झैन‘ (Zain) या कंपनीचा आफ्रिकेमधला सर्व पसारा आपण विकत घेतल्याचे जाहीर केले व असे म्हणता येईल की भारतीय कंपन्यांना एक नवीन कार्यक्षेत्र दाखवून दिले. काही विश्लेषणकारांनी या घटनेचे वर्णन, आफ्रिका खंडात प्रवेश मिळवू ...