देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भुलाबाई

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास... बुधवार, २७ जुलै २०११, १७:३६ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात. या गीतांचे गेयता आणि आशय हेच बलस्थान असल्याने त्यात रचनाशैली, खोटा समाजाभिमुख बेगडीपणा, आलंकारिक शब्दरचना वगैरे कृत्रिमरित्या अनावश्यकपणे घुसडण्याची त्या महिला गीतरचनाकारांना ...

झिलपी बाई झिलपी रविवार, २४ ऑक्टोबर २०१०, १०:३१ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

झिलपी बाई झिलपी

झिलपी बाई झिलपी
झिलपी बसली नाहाले
शंकर गेले पाहाले
असे शंकर भ्याले
फ़ूलं वेचत गेले
फ़ुलात पडली अंबाई
नाव ठेवले भिमाई
भिमाईच्या टोपल्या
ठाई ठाई गुंफ़ल्या
एक ठाई हारपली
मामा घरी सापडली
असे मामा चोर
खिडकी आंबा गोड
खिडकी आंबा कोणाचा

भुलाबाईचे सासरे कसे? मंगळवार, १९ ऑक्टोबर २०१०, २०:५८ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

भुलाबाईचे सासरे कसे?

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे

भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा

भुलाबाई भुलाबाई भासरे कसे गं भासरे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वंयपाकीन जशी गं स्वंयपाकीन जशी

भुलाबाई ...

एकच पापड भाजला : हादग्याची गाणी सोमवार, १२ जुलै २०१०, १३:०४ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

एकच पापड भाजला : हादग्याची गाणी

एकच पापड भाजला,भाजला
चुलीमागे ठेविला,ठेविला
सासुबाईने पाहीला,पाहिला
कोरा कागद लिहिला,लिहिला
झुनझुन गाडी जुंतली,जुंतली
त्यात मैना ...

या या भुलाबाई : हादग्याची गाणी रविवार, ११ जुलै २०१०, ०९:३३ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

या या भुलाबाई : हादग्याची गाणी

(१)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात हिरवी चोळी
हिरव्या चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडले दाणे
भुलोजी राणे घरी नाही,घरी नाही.

(२)

या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या ...

कृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी बुधवार, १४ एप्रिल २०१०, १३:३८ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

कृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

‘आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून’
“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

‘आई मला साप दे आणून, ...

ऐलमा पैलमा : हादग्याची गाणी शनिवार, १० एप्रिल २०१०, १६:३६ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

ऐलमा पैलमा : हादग्याची गाणी

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवत गुंजे गुंजावाणी
गुंजावाणी —च्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा (हे चाल बदलून)
कांदा चिरू बाई तांदूळ घ्या
आमच्या आया, तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची वाजली टाळी (हे म्हणताना टाळी वाजवायची)

श्री गणराया : हादग्याची गाणी मंगळवार, ०६ एप्रिल २०१०, १९:५५ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

श्री गणराया : हादग्याची गाणी

आधी नमुया श्री गणराया
मंगलमुर्ती विघ्न हराया
मंगलमुर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा ( चाल बदल)
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडील हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या ...

शिवाजी अमुचा राजा : हादग्याची गाणी शनिवार, ०३ एप्रिल २०१०, ११:५६ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

शिवाजी अमुचा राजा : हादग्याची गाणी

शिवाजी अमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
सात विहिरींमधे एक एक कमळ
एक एक कमळ तोडीले
भवानी मातेला अर्पण केले
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायाला तलवार दिली
तलवार… घेऊनी आला…( इथे चाल बदल)

लोणी खाल्लं कोणी : हादग्याची गाणी शुक्रवार, ०२ एप्रिल २०१०, ०७:४२ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

लोणी खाल्लं कोणी : हादग्याची गाणी

नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंकाळ्यातलं/शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी
तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी….
आता माझा दादा येईलग येईलग
दादाच्या मांडीवर ...