माझ्या मनातलं थ...
या नभातल्या स्वरांनी
दाटून आभाळ येते
कशी लाज पांघरूनी
धरती न्हाऊन निघते
होते आभाळाला घाई
खाली ओंजळ सांडण्याची
पावसाच्या थेंबातूनी
जणु मोती बरसण्याची...
क्षणा क्षणाला फुलते
प्रीत चिंब भिजते
साजणाची आठवण
कशी मनात जागते...
गंध मातीला सुटतो
मन गारव्यानं झुलतं
पावसाच्या आनंदानं
सारं शिवारं ...