देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शेतकरी गाथा

महिमा कशाचा ? शनिवार, २२ मे २०१०, १९:३५ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

महिमा कशाचा ? 

कृपया एक गणित सोडवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर….

१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता व्यवसायात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
४) जर त्याने त्याची ...

सजणीचे रूप …!! मंगळवार, १८ मे २०१०, १९:३३ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता ...

सजणीचे रूप …!!

(पंढरीचा पांडुरंग आणि संतश्रेष्ट
तुकारामांच्या पायी नतमस्तक होवुन)

रूपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ...

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती. गुरुवार, १३ मे २०१०, १८:४३ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

                         १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे.
१९७० नंतर शेतीची उत्पादकता कमी झालेली नाही या उलट शेतीमधिल ...

बागायती कापसाचा उत्पादन खर्च रविवार, ०९ मे २०१०, १९:५९ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
———————————————–

अ) चालू ...

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च शुक्रवार, ०७ मे २०१०, २०:३४ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च.

प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:

भांडवली खर्च :

१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
———————————————–

अ) चालू ...

खरेच बियाणे वांझ होते … ? शनिवार, ०१ मे २०१०, ०९:१७ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

खरेच बियाणे वांझ होते … ?

“भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?”

               बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची…पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ ...

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबी... शनिवार, २४ एप्रिल २०१०, ०९:३२ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

                   आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार शिबिरे आयोजित करावी, असा वारंवार सल्ला दिला जातो त्या अनुषंगाने खालील बाबींचा विचारवंताकडून खुलासा होणे आवश्यक आहे.

१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे ...

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग शनिवार, १७ एप्रिल २०१०, २१:३८ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग.

                 बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. नत्र,स्फ़ुरद, पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे. पैकी नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांची निर्मीतीसाठी प्रचंड गुंतवणुकीचे कारखाने लागतात.

परंतू सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा ...

गाय,वाघ आणि स्त्री शुक्रवार, १६ एप्रिल २०१०, ०७:४८ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

गाय,वाघ आणि स्त्री

बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.
दोघीही शारिरीक अंगाने अबलाच.स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.
निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गीक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही ‘हत्यारे आणि ढाली’ दिल्या आहेत.
उदा :- उंदराला बिळात घुसता येते,मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे उंदराचे रक्षण होते.

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन बुधवार, १४ एप्रिल २०१०, १९:१८ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

………………………………………………………………………..
आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटुन जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवेनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत वाढतच जाते.वैताग येतो.आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणुन ...