देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Audio-Video

कसे सरतील सये - संदीप खरे शुक्रवार, ०९ सप्टेंबर २०११, १०:३५ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ?
सरताना आणि सांग सलतील ना !
गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना ! .....

पावसाच्या धारा धारा ..... मोजताना ...

आता कशाला उद्याची बात ? - अनंत काणेकर सोमवार, २२ ऑगस्ट २०११, ०७:१४ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
आता कशाला उद्याची बात ?
बघ उडुनि चालली रात

भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात

हा ज्वानीचा बहार -
लुटू या
भरवसा न ...

प्रेमा, काय देऊ तुला ? - पी. सावळाराम बुधवार, ०३ ऑगस्ट २०११, १०:०९ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
प्रेमा, काय देऊ तुला ?
भाग्य दिले तू मला

प्रीतीच्या या पाखराचे रत्‍नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून मोहरलेला

या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढ ती तुला हवी ...

देव जरी मज कधी भेटला - पी. सावळाराम सोमवार, ०१ ऑगस्ट २०११, ०९:१६ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
देव जरी मज कधी भेटला,
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे,
जीवन देई मम बाळाला

कृष्णा गोदा स्नान घालु दे,
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी, ...

कळीदार कपूरी पान - राजा बढे बुधवार, ०६ जुलै २०११, १०:१९ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना
रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा

बारीक सुपारी निमचिकनी घालून
जायपत्री वेलची लवंग वरी दाबून
बांधले तसे या कुडीत ...

तरुण आहे रात्र अजुनी - सुरेश भट मंगळवार, ०५ जुलै २०११, १०:०८ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का ...

धुंद मधुमती - ग. दि. माडगूळकर सोमवार, ०४ जुलै २०११, ११:४१ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
धुंद मधुमती रात रे, नाथ रे,
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा, नाथ रे, नाथ रे

जल लहरी या धीट धावती
हरित तटांचे ओठ चुंबिती
येइ प्रियकरा, येइ मंदिरा
अलि रमले कमलात रे, नाथ ...

अग्गोबाई ढग्गोबाई - संदीप खरे शनिवार, ०२ जुलै २०११, ०७:२२ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ...

पराधीन आहे जगतीं - ग. दि. मा शुक्रवार, ०१ जुलै २०११, ०८:४३ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या ...

जिवलगा, कधि रे येशील तू ? - ग. दि. मा मंगळवार, २८ जून २०११, १०:१६ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू ?

धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाइचा सुके फुलवरा
नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू !
जिवलगा, कधि रे येशील तू ...