ट्रॅफीक जॅम काही नवीन गोष्ट नाही. पण पावसाळ्यात आमच्या पुण्यात ‘ट्रॅफीक जॅम’चा सिझन असतो. काल असंच डांगे चौकापासून ते हिंजवडीपर्यंत ट्रॅफीक जॅम होता. आमच्या कंपनीची बस रांगत रांगत कंपनीपर्यंत जायला दीड तास लागला. डांगे चौकातून बस रांगायला सुरवात झाली. सुरवातीला एवढी ट्रॅफीक का झाली आहे ते कळेना. हायवेच्या पुलाजवळ उभे असलेले पोलीस बघितल्यावर लक्षात आले की नेमके कारण काय. ...