देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वाद

भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपु... रविवार, १६ ऑक्टोबर २०११, १६:१९ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

भारतीय उपखंडात निरनिराळ्या आजारपणांचे प्रमाण वाढते आहे. त्यात मधुमेह, हॄदयरोग, स्थुलपणा आदी गृहीत धरा. वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसृत करत असतात. जरी ती आकडेवारी आहे तितकी खरी मानली नाही तरीही वरील आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच. हे आजारपण वाढण्यामागे अनेक कारणे असतीलही - जसे बदलती जीवनशैली, आर्थीक स्थिती उंचावणे, अन्नघटकाचे पोषणमुल्ये, सुपोषण आदी. ...

लेखन व लेखकाचे बाह्यरुप शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०४:३४ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप ...

जोसेफ ललीव्हेल्ड यांच्या ‘नजरेतले’गांधी... गुरुवार, ०७ एप्रिल २०११, १३:०१ (+०५:३०)

दीपक लेख संग्रह ...

मार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेते महात्मा गांधींना आदर्श मानतात. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्ते हादरले, उखडले गेले तर ’ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात’, असे जगभर म्हटले जाते. अमेरिका वा युरोपातल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा मान मिळतो; याची पोटदुखीच ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, त्यातून त्यांचाच वंशवाद ...

वादविवादस्थान शुक्रवार, २४ सप्टेंबर २०१०, ०१:०८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काय मजेदार देश आहे आपला, इथे जन्मापासून मरेपर्यंत सगळीकडे वादच वाद. ‘शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?’ याचा वाद. त्याचे गुरु कोण यावर देखील वाद. एवढे तरी बर की ‘आई’ कोण यावरून वाद नाहीत. अरे, आजचा खरा खुरा ‘शोले’ राममंदिर.. त्यावर सुद्धा वाद. देवाला सुद्धा नाही सोडले. मुंबई कोणाची? यावर सुद्धा वाद. मुळात देश ‘निधर्मी’ की ‘हिंदूराष्ट्र’ यावर सुद्धा वाद आहेच म्हणा. अरे हिंदुस्थान की ...

प्रेम शनिवार, ११ सप्टेंबर २०१०, १८:२० (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

खर सांगतो. अजूनही मला हाच प्रश्न पडलेला आहे. प्रेम म्हणजे नेमक काय? याच उत्तरच सापडत नाही आहे. मी संगणकाचा कोर्स करीत असतांना माझी एक मैत्रीण होती. म्हणजे आमची दोघांचे खूप वाद आणि मस्ती चालायची. एकमेकांना खेचाखेची सोडून काहीच नाही चालायचे. ती इन्स्टिट्यूटमध्ये आली की तीचा पहिला प्रश्न हाच असायचा की ‘हेमंत कुठे आहे?’. आणि मी गेलो तरी हेच. अस थोडे थोडके नाही दीड एक वर्ष चाललेलं. ती ...

ऑफिसातले गाणे रविवार, २० जून २०१०, ११:०२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

ऑफिसातले गाणे

जय महाराष्ट्र मंडळी!
आपण बहूतेक सगळेच नोकरदार मंडळी आहोत. कुठे ना कुठे कळफलक बडवतो, खर्डेघाशी करतो, हात काळे करतो. तर बहुतेक ठिकाणी (म्हणजे आय टी सेक्टर मध्ये) कामे करतांना गाणे ऐकणे आता सर्वसाधारण आहे. कुठे एका सेंट्रल स्पिकरवर गाणे वाजवले जाते. कुठे सेंट्रलाईझ म्यूझीक सिस्टीम असते. तर कोठे अशी व्यवस्था नसल्याने जो तो आपापला हेडफोन लावून गाणे ऐकत बसतो. आता ...

त्याचे तिचे प्रश्नोत्तरे शनिवार, २९ मे २०१०, २१:३६ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

त्याचे तिचे प्रश्नोत्तरे
सिच्यूएशन: हिरो हिरवीनीची छेडाछेडी
चाल: थोडीशी सवाल जबाबासारखी

तो:
गोरा गोरा रंग अंगी चोळीही तंग
पदर कमरेला विळखा घाली
असती आपल्यातच दंग
चाल तुझी मोरावानी
हरणापरी चपळ अंग
कुठं जाशी कुठून येशी
सांग सांग सांग पोरी
सांग सांग सांग

ती:
गोरा गोरा रंग माझा नाही गर्वाने धुंद
शिंप्याची चुक झाली
केली चोळी त्याने ...

मनसे व सीमावाद धोरण शनिवार, २७ फेब्रुवारी २०१०, ०३:१८ (+०५:३०)

Man at work पाषाणभेद - PashanBhed

मनसे व सीमावाद धोरण
(डिस्केमर: इतर पक्षांबाबत काही ताशेरे येथे नाहीत पण उगाच वाद नको. इतर पक्षाच्या लोकांनी 'मनसे' ऐवजी त्यांच्या पक्षाचे नाव टाकावे व वाचल्यास हरकत नाही. 'मनसे' ही एक मानवी प्रवृत्ती आहे हे लक्षात घ्या.)

(शेवटी सीमावादातले लोकं मराठी आहेत ते महाराष्ट्रात आले पाहीजे. त्यासाठी पक्षविरहीत राजकारण व्हावे ही माझी ईच्छा. पण तसे होणे नाही. मनसेच्या नावातच ...