देवनागरी
Roman
Press F12 to toggle

एक्सप्रेस

पुन: हरी ब्लॉग शनिवार, ०८ ऑक्टोबर २०११, १४:३९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये

कशी सुरवात करू तेच समजत नाही आहे. अनेक दिवसांनी, पुन्हा: एकदा ब्लॉग सुरु करतो आहे. खर तर काय बोलावं, आणि कशी वाक्यरचना करावी यातच घोळ होतो आहे. खूप दिवसांनी बोलतोय म्हणून कदाचित अस घडत असेल. पण, मनात आनंद मात्र नक्की होतोय. मध्यंतरी मी, एक-दोन ब्लॉग सुरु करून पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात मन नाही रमलं. आजकाल ...

माऊवादी सोमवार, १२ एप्रिल २०१०, ०१:३७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आम्ही माऊवादी, सरकार उगाचंच आमच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करीत आहे. बघा ना! आम्ही लाल वस्त्रे घालून, अरे असा काही विचार करू नका. आम्ही ओशोवाणी ऐकून तसले काही उद्योग करीत नाही. आम्ही फक्त क्रांती करतो. हो! खोट वाटत का? दांतेवाड्यात आम्ही काय ७६ सैनिकांना मारलं. आमच्या लॉर्ड माऊ ने हे अस केल म्हणजे क्रांती झाली अस म्हटलं आहे. कोण माऊ? काहीतरीच काय विचारता. गिनीज बुक कधी तरी चाळा. ...

थ्री इडियट्स शुक्रवार, १२ मार्च २०१०, ०१:०८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

चित्रपट सुरु होतो. मुलायम कुरेशी विमानात बसून फोनवर बोलत असतो. अचानक त्याला त्रास व्हायला लागतो. विमान दिल्ली विमानतळावर उतरवले जाते. डॉक्टर मुलायम कुरेशीला घेऊन जात असतांना अचानक तो उठतो आणि डॉक्टरांना म्हणतो ‘मी ठीक आहे. तुम्ही जा. मी स्वत: माझ्या घरी जाईल’. विमानतळ सोडून आपल्या मित्राला म्हणजे शरद रस्तोगीला फोन करून बोलावून घेतो. दोघेही आपल्या ठरलेल्या ‘मुघल’ गार्डनमध्ये ...

रेल्वे गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१०, ०९:२१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल ममताजीन रेल्वे बजेट सादर करायला सकाळी घरातून निघाल्या असतील. आणि इकडे आमच्या चिंचवडमध्ये सकाळची सात वीसच्या लोकलच्या कृपेने ती ओव्हरहेड वायर तुटली. मग काय पुढच्या लोकल रद्द आणि मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेस तासभर उशिरा सुटल्या. डेक्कन क़्विनने पिंपरीत तासाभराची विश्रांती घेतली. तीच्या विश्रांतीनंतर प्रगती, सह्याद्री देखील तासभर उशिराने निघाल्या. सगळ्या लोकल ...