देवनागरी
Roman
Press F12 to toggle

केंद्र

पंतप्रधानांची विशेष मुलाखत सोमवार, ०५ जुलै २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

नमस्कार पंतप्रधान साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तर मग आपण मुलाखत सुरु करूयात का?
पंतप्रधान- सोनियांना विचारलंस ना?
मी- हो, त्या हो म्हणाल्यात!
पंतप्रधान- (एक मोठा उसासा घेत..) मग कर की सुरु! जो बोले सो निहाल. अरे हो, निहालभाई काय म्हणाले माझ्याबद्दल??
मी- आपण ते मुलाखती नंतर बोलले तर चालेल?
पंतप्रधान- बर.

सुट्ट्यांचा देश रविवार, २८ फेब्रुवारी २०१०, १०:५३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल त्या महानगरपालिकेच्या ‘माहिती अधिकार’ विभागात अर्ज देण्यासाठी गेलो. बर, चिंचवडमधील ‘माहिती अधिकार’ विभागाचे कार्यालय चाफेकर चौकात. पण हेच ते कार्यालय हे त्या त्याच्या बाजूच्या रिक्षावाल्याला देखील माहित नव्हते. तासभर फिरल्यावर शेवटी मला त्या बसपास केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगतले. बर जाऊनही काही फायदा झाला नाही. सुट्टी होती. तीन दिवस सुट्टी आहे. तशी मलासुद्धा तीन दिवस ...

जंगलराणीच अभिभाषण बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०, ००:४१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माननीय सदस्य ‘प्राणी’ गण,
या नव्या दशकात दोन्ही गुहेतील पहिल्या सत्राला आपण सगळे उपस्थित आहात. मी तुमचे स्वागत करते (म्याऊ..). मला हा विश्वास आहे की तुम्ही सर्व जण या जंगलाला समृद्धीच्या दिशेने आणि विश्वात एका उच्च जागी नेण्यासाठी समर्पित होऊन काम कराल आणि गौरवपूर्ण दशक बनवाल. पुढे अजून शिकारी करायच्या आहेत म्हणून तुमच लक्ष अपेक्षित आहे.

मी त्या मुंग्यांच्या ...

मेट्रो सोमवार, २२ फेब्रुवारी २०१०, १९:५८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

पुण्यात ‘मेट्रो’ रेल्वेचा प्रकल्प सुरु होणार आहे. खर्च दहा हजार कोटी. या शनिवारी आमच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आठ टक्के करवाढ मंजूर करून घेतली आहे. १०५ नगरसेवकांपैकी ३४ नगरसेवकांनी करच्या बाजूने मतदान केले. आणि अनेक नगरसेवक गैरहजर राहिल्याने तो प्रस्ताव मंजूर झाला. आता तो जो ‘मेट्रो’ रेल्वे प्रकल्प सुरु करण्याचा हट्ट आमच्या दोन्ही महानगरपालिकांनी घेतला आहे ...