देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आनंद - मनातले

भाराभार चिंध्यांतली एक चिंधी.... गुरुवार, २८ एप्रिल २०११, २२:११ (+०५:३०)

भानस Sardesaies

सतत काहीतरी करत राहायचे, शिकत राहायचे या नादाने पछाडलेले असल्याने बरेचदा अनेक गोष्टी आत्मसात केल्या जातात. पण लगेच पुन्हा एखादे नवीन आकर्षण समोर येते आणि आधी शिकलेल्या कलेवर पुरेसे काम म्हणा, हात ...

हे सुरांनो, चंद्र व्हा... शुक्रवार, ०५ नोव्हेंबर २०१०, ०२:१९ (+०५:३०)

भानस Sardesaies

शुभ दीपावली!!!

हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥

या शब्दांमधली आर्तता काळजाचा ठाव घेणारीच. डोळे तुडुंब भरलेले, श्वास कोंडलेला, गळा दाटलेला तरीही मन बोलण्यासाठी स्वरांची वाट शोधणारे.... काहीसे जीवघेणे, तर कुठे तरल, भावविवश. शब्द कुसुमाग्रजांचे. या शब्दातली ...

मी मायदेशी... रविवार, २४ ऑक्टोबर २०१०, ००:३३ (+०५:३०)

भानस Sardesaies

१५ सप्टेंबर नंतर ब्लॉगवर काहीच लिहिले नाही. कारण अचानक ठरलेला मायदेशाचा दौरा. अचानक ठरल्याने फार काही योजनाबद्ध, आखीव रेखीव नियोजन शक्यच नव्हते. परंतु मायदेशी जायला मिळणार... तिकीट बुक झाले आणि मन आनंदून गेले. वेळ फारच थोडा आणि कामे फार त्यामुळे ब्लॉगवर निदान आठवड्याला तरी एखादी पोस्ट यावी ही तरतूद काही करता आली नाही. थोडी रुखरुख लागली. अजिबात पोस्ट नाही असे ब्लॉग सुरू ...

चित्रदगड - पिक्चर्ड रॉक्स... अंतिम रविवार, ०८ ऑगस्ट २०१०, ०२:५४ (+०५:३०)

भानस Sardesaies

संध्यासमय

पानी रे पानी तेरा रंग कैसा...

झेपावणारे समुद्रपक्षी

परतीच्या प्रवासात एका विवक्षीत जागी बोट पोहोचताच साठ-सत्तर समुद्रपक्षी अचानक आमच्यावर झेपावू लागले. लांबून गोंडस दिसणारा हा पक्षी प्रसंगी किती रौद्ररूप घेउ शकतो याची झलक मिळाली. कमीतकमी अडीचशे लोक तरी आम्ही होतो तरीही अतिशय वेगाने व उग्र आवेशात हे आमच्यावर झेपावत होते. सावजावर झडप घालताना ...

चित्रदगड- पिक्चर्ड रॉक्स.... २ शुक्रवार, ०६ ऑगस्ट २०१०, २३:२० (+०५:३०)

भानस Sardesaies

भव्य भिंती... त्यातून दिसणारा आकाशाचा तुकडा

पाचूने मढलेल्या तटबंद्या

पाचूच्या प्रदेशात शिरताना

बांधून काढल्यासारखे अजस्त्र दणकट स्तंभ
हिरवेगार पाणी... पाण्याच्या सपकार्‍यांनी झालेल्या कपारी

चित्रदगड - पिक्चर्ड रॉक्स गुरुवार, ०५ ऑगस्ट २०१०, ०७:५७ (+०५:३०)

भानस Sardesaies

नेटीव इंडियन चेहरा

गेल्यामहिन्यातपाहुण्यांनाघेऊन, " मॅकिनॉवआयलंड, सूलॉक्स, टकमिनॉवफॉल्सवपिक्चर्डरॉक्स " असाएकमस्तदौराकेला.यावेळी पिक्चर्ड रॉक्सपासूनसुरवातकरूनउलटेमागेयेतेय. मॅकिनॉवचावृत्तांतकाहीदिवसांपूर्वीइथेदिलाचआहे. यावेळीनवीनकाहीफोटोंचीभरपडलीअसल्यानेशेवटीतेफोटोटाकेनच.

मंडळी, या ताव मारायला..... बुधवार, २१ जुलै २०१०, २२:१७ (+०५:३०)

भानस Sardesaies

दिवसभराच्या उपासाने आता थोडेसे दमला असाल, काहींना उपास लागलाही असेल. फळे, दूध, ज्यूस इत्यादींनी पोटाला आधार मिळतो पण जिभेचे चोचले पुरवले जातच नाहीत. उपासाच्या दिवशी अगदी पहाटेपासून अर्धवट झोप व जागेपणाच्या सीमारेषेवर घुटमळणारे माझे मन इतकी अनाप शनाप स्वप्ने पाहते..... .. कसली ते कळले ना....... . एरवी ज्या पदार्थांकडे मी आवडीने सोडाच पण नाईलाजाने तरी खावा असेही पाहणार नाही तेही ...

माझी व लाखों-करोडोंची लाईफलाईन...... बुधवार, ०५ मे २०१०, १०:४८ (+०५:३०)

भानस Sardesaies

तिला प्रथम कधी बरं पाहिलं होतं मी...... आई सांगते त्यानुसार जेमतेम वर्षाची असेन. दादर ते अंधेरी हा नेहमीचा प्रवास. मामा अंधेरीला राहायचा नं. तेव्हांपासून ती माझी व मी तिची झालेली. गेल्या जन्माचे माहीत नाही पण या जन्माचे ऋणानुबंध नक्कीच होते. आम्ही ठाण्याला शिफ्ट होऊन दोन-तीनच महिने झाले होते. स्कूटर स्टॅंडला लावतानाच ८.५३ आज तिनावर येतेय हे ऐकताच मी नवऱ्याला टाटा करून पळत सुटले. ...

काळाच्या ओघात लुप्त झालेली काही रत्ने -... बुधवार, २८ एप्रिल २०१०, ०५:१९ (+०५:३०)

भानस Sardesaies

गेले काही दिवस १९७५ ते १९९० या कालावधीतील, त्यातही ७५ ते ८२-८३ पर्यंत अगदी सारखी ऐकलेली काही गाणी मनात घोळत आहेत. १९७५ च्या आधीही ही कानावर पडत होतीच. आमच्या आईचा गळा अतिशय सुरेल. तिच्या ऐन उमेदीच्या दिवसात नाशकामध्ये ती - पूर्वाश्रमीची सिंधू भट आणि माझी कै.सौ.मंदामावशी प्रती " लता व आशा " म्हणून प्रसिद्ध होत्या. आईने अनेक नाटकातही कामे केलेली.( १९५२ ते १९६२ ) पुढे लग्न होऊन ती मुंबईस ...

मराठी माणसाला काय येतं ??? शुक्रवार, २६ मार्च २०१०, २०:१७ (+०५:३०)

भानस Sardesaies

मंडळी, हा विरोप आपल्या सगळ्यांना आला असेल - आपणही अनेकांना धाडला असेलच. तरीही मला ब्लॉगवर टाकायचा मोह आवरलाच नाही. या सगळ्या व अशा अनेकांनी आपल्याला सार्थ अभिमान वाटावा असेच उत्तूंग कार्य केले आहे. अनेक महत्वाची नावे यात नसली तरी ती मनात ...