माझे व्यावसायिक आयुष्य मी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात व्यतीत केलेले असल्यामुळे, माहिती तंत्रज्ञान उद्योग हा माझ्या मनात नेहमीच एक यक्षप्रश्न म्हणून राहिलेला आहे. संगणक मी वापरतो. या तंत्रज्ञानाने मिळालेल्या सुविधा सुद्धा एक उपभोक्ता म्हणून मला अतिशय आवडतात. तरीही या सुविधा देणार्या आंतरजालावरच्या फेसबूक, ट्विटर किंवा गुगल सारख्या कंपन्या, उत्पन्न ...