पहा मायक्रोसॉफ्टची नवीन मोबाईल कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष वापर होतानाचा व्हिडीयो...
पहा मायक्रोसॉफ्टची नवीन मोबाईल कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष वापर होतानाचा व्हिडीयो...
नुकताच एक व्हिडीयो पाहण्यात आला, ज्यात मोटोरोलाचा नवीन आणि महत्वाकांक्षी मोबाईल हँडसेट 'मोटो ड्रॉईड' एका रोबोटला जोडण्यात आला होता, आणि त्याच्या कॅमेर्याचा वापर करून, रुब्रिकचा ठोकळा सोडवण्याचा प्रयत्न केला गेला.
आलेले निकाल खरोखर धक्कादायक आहेत. मोटोड्रॉईडला रुब्रिकक्यूब सोडवायला केवळ २४ सेकंद लागले.
जोडलेला व्हिडीयो पहा.
नेट अॅप्लिकेशनच्या पाहणीनुसार, एप्रिल महिन्यात इंटरनेट एक्स्प्लोररच्या वापरणार्यांच्या संख्येत ऐतिहासीक घसरण झाली असून, ते प्रमाण आता ६०% च्या खाली गेले आहे. इंटरनेट एक्सप्लोरर ४ च्या (१९९९) नंतर प्रथमच हे प्रमाण इतक्या खाली गेले आहे. ह्या घटीसाठी हातभार मात्र गूगलच्या क्रोम या ब्राऊजरने लावला आहे. सलग चौथ्या महिन्यात, क्रोमने दोन आकडी वाढ दाखवत, अॅपलच्या सफारीला २ ...
आयपॅड, अॅपलचे नवीन स्वप्न अखेर बाजारात उपलब्ध झाले. अॅपलने नुकतेच जाहिर केले आहे की गेल्या शनिवारी ३,००,००० आयपॅड विकले गेले, तरीही अॅपलचे म्हणणे आहे की काही दुकाने शनिवारी बंद असल्याने विक्री अपेक्षेपेक्षा कमी आहे. सध्या फक्त वायफाय असलेले मॉडेल उपलब्ध आहे. ३जी मॉडेल या महिनाअखेरीला मिळू लागेल.
अॅपलने तक्रारींच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचा रस्ता धरला आहे. आयपॅडचे ...
नुकताच मी कॉल ऑफ ड्यूटी मालिकेतला सर्वात नवीन खेळ खेळून संपवला. 'मॉर्डन वॉरफेअर - २' हा अतिशय सुंदर बनवलेला गेम आहे. इंन्फीनिटी वार्डने अगोदरच्या कॉल ऑफ ड्यूटी मालिकेपासून(COD -1, COD -2 United Offensive etc.) पासून खूपच सुधारणा केली आहे. पहिले गेम्स खेळलेल्यांना माहित असेल, की त्यांची रचना 'घडनाक्रमावर अनुसरून' (event based) होती. या नवीन खेळात मात्र अत्यंत व्यवस्थित ठरवण्यात आलेला व 'कार्य अनुसरून' (action based) असा ...
आजवर मी (आणि इतरांनीही) विंडोज मोबाईलबद्दल जे बोललो होतो ते लवकरच इतिहासजमा होइल. बार्सिलोनाच्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फोरन्स २०१० मध्ये मायक्रोसॉफ्ट आपला दुसरा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट दाखवणार आहे.
'विंडोज मोबाईल सेव्हन सिरीज', ही संपूर्णपणे नवी मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असणार आहे. मायक्रोसॉफ्टने ते खरोखर मुत्सद्दीपणे केले आहे. एक संपूर्ण नवीन सिस्टीम नव्याने उभी ...
मायक्रोसॉफ्टचे विंडोज मोबाईल ६.५ जगाला फारसे मोहात पाडू शकले नाही. पण विंडोज मोबाईलच्या पुढच्याआवृत्तीकडून मात्र खूप अपेक्षा बाळगल्या जात आहेत आणि तो क्षण जवळ आलाय.
बार्सिलोनामध्ये उद्या पासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० मध्ये विंडोजमोबाईलचा नवा अवतार मायक्रोसॉफ्ट जाहीर करेल अशी बातमी आहे. काल मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० ...