देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कविता : नागपुरी तडका

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०१०, ०९:२७ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

                            श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.

                            मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे ...

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन गुरुवार, ११ नोव्हेंबर २०१०, २३:५९ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन

श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ ...

आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका बुधवार, २० ऑक्टोबर २०१०, १४:२२ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

आंब्याच्या झाडाले वांगे : नागपुरी तडका

माणसावाणी निती सोडून वृक्ष वागत नाही
म्हणून आंब्याच्या झाडाले वांगे लागत नाही ….!

अवर्षण येवो किंवा सोसाट्याचे वादळ
बहर आणि मोहर कधी त्याचे थांबत नाही ….!

पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया
बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ….!

कोकीळ येवो, माकड येवो किंवा येवो घुबड

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका रविवार, १५ ऑगस्ट २०१०, २२:०९ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्‍तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्‍तिच्या बैनमाय भलतंच झालं …… !!

जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर ...

नाकानं कांदे सोलतोस किती? : नागपुरी तडका गुरुवार, ०५ ऑगस्ट २०१०, १०:२७ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

नाकानं कांदे सोलतोस किती? : नागपुरी तडका

तुझा अभ्यास किती, तू बोलतोस किती
नाकानं कांदे सोलतोस किती?

तुझी नशा किती, तू डोलतोस किती
नाकानं डांगरं तोलतोस किती?

तुझा व्यायाम किती, तू पेलतोस किती
नाकावर भेद्रं झेलतोस किती?

तुझी मेहनत किती, तू राखतोस किती
नाकानं टेंभरं चाखतोस किती?

तुझे योगदान किती, तू लाटतोस किती
नाकानं गांजरं वाटतोस किती?

तुझी सत्ता किती, तू ...

विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका गुरुवार, २२ एप्रिल २०१०, २३:०२ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका

औंदाच्या उन्हाळ्यानं, धमालच केली
आनं श्याम्याची दाढीमिशी, भाजूनच गेली ……॥१॥

हे ऊन व्हंय कां कां व्हंय, काही समजत नाही
पाण्यासाठी जीव कसा, करते लाही-लाही
पन्नास डिग्रीच्याह्यवर, पारा चढून गेला
पाणी पेऊ-पेऊ जीव, आदमुसा झाला
इच्चीबैन ओठ-जीभ, सोकूनच गेली ……॥२॥

बाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते
घरामंधी घुसावं तं, ...

कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका बुधवार, १७ मार्च २०१०, ०९:०२ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका

राजकर्‍यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

अकबर होता, जुलूम होता, अन सुलतानी सत्ता
खुशालचेंडू मजेत होते, घामाची हालत खस्ता
काय निराळे आज वाटते, तितकेची सांगावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

इंग्रज होते, लूटत होते, येथिल कच्च्या माला
पक्का करूनी, चौपट दामा, विकत ...

खाया उठली महागाई : नागपुरी तडका रविवार, १४ मार्च २०१०, ०९:१४ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

खाया उठली महागाई : नागपुरी तडका

नाकी तोंडी पाणी घुसले, जीव झकोले खाई
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई…!!

आवतन नव्हते दिले तरी, वाजत-गाजत आली
एक तारखेस खिसा भरला, पाच तारखेस खाली
देवदर्शन दुर्लभ झाले, आता पायी पंढरीवारी
गहाळ झाल्या सोई-सुविधा, परी कर वाढतो भारी
धान्यामधी खडे मिसळती, शासक टूकटूक पाही
वेसन तुटली, स्वैर सुटली, खाया उठली ...

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका शुक्रवार, १२ मार्च २०१०, १९:१४ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवुन गेला…

त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन,
म्हुन तिले आंगभर, कपडे भेटत नसन,
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते,
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते,
म्हुन त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला….

जुहुच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली,
तिले पाहुन शाम्याची, बंदी विकेट गेली,

धकव रं श्यामराव – नागपुरी फ़टका सोमवार, ०८ मार्च २०१०, ०९:४२ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

धकव रं श्यामराव – नागपुरी फ़टकाधकव रं श्यामराव झोल नको खावू
नशीबाची गाथा नको कोणापाशी गावू….!

    रगताचं पाणी करून रान शिंपलं बावा
    गारपिटानं ...